23/08/2026
*वि.रा.आं.स कोअर कमेटी सभा*
===================
9 ऑगस्ट 2026 च्या मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे *विदर्भ राज्य आंदोलन समितीचे* सर्व सन्माननीय कोअर कमेटी मेंबर्स, जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक, सर्व आघाड्यांचे (महिला, युवा) जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, व सर्व पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक *मंगळवार, दिनांक : 25 ऑगस्ट 2026 रोजी, दुपारी 12:00 वाजता, विराआंस मुख्यकार्यालय, 214, केदार भवन, जे.बी ठक्कर मार्ग, गिरीपेठ, नागपूर येथे आयोजीत करण्यात आली आहे.*, करिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*बैठकीची विषय पत्रिका*
1. *दी: 8 सप्टेंबर 2026* रोजी *अहेरी* जिल्हा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या "विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याची" पूर्व तयारी व नियोजन करण्या बाबत चर्चा .
2. *दी : 28 सप्टेंबर 2026* रोजी विदर्भातील 11 ही जिल्ह्यात व 120 तालुक्यात करावयाच्या *" नागपूर करार होळी"* आंदोलनाचे नियोजन व पूर्व तयारी करण्या बाबत चर्चा .
3. *दी : 2 ऑक्टोबर 2026*, गांधी जयंतीच्या दिवशी नियोजित करावयाच्या सेवाग्राम / वर्धा येथे "विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावाचे" नियोजन व पूर्व तयारी बाबत चर्चा.
4. वरील कार्यक्रमाच्या पूर्व तयारी व नियोजन करता कोअर कमेटी नेत्यांचा दौरा कार्यक्रम ठरविणे.
5. अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय.
*विनीत*
*ॲड. वामनराव चटप*
अध्यक्ष विराआंस तथा माजी आमदार
*मा.प्रकाशभाऊ पोहरे*
प्रबंध संपादक, दैनिक देशोन्नती
*डॉ. श्रीनिवास खांदेवाले*
मार्गदर्शक, विराआंस तथा जेष्ठ अर्थतज्ञ
*मुकेश मासुरकर*
प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी
*अरुणभाऊ केदार*
अध्यक्ष, पूर्व विदर्भ
*प्रा. डॉ. पी. आर. राजपूत*
अध्यक्ष, पश्चिम विदर्भ
*सुनिलभाऊ चोखारे*
उपाध्यक्ष, पूर्व विदर्भ
*ॲड. सुरेशराव वानखेडे*
उपाध्यक्ष, पश्चिम विदर्भ
*तात्यासाहेब मत्ते*
विदर्भ प्रचार प्रमुख
******