Deccan Adventure Club - गिरीवीर

Deccan Adventure Club - गिरीवीर Some time for Nature and for our glorious History..

20/05/2022

सातमाळा डोंगर रांग व त्यातील किल्ले चांदवड (कुणीतरी रेकॉर्ड केले होते तेव्हा🙏)

भारताचा प्राचीन इतिहास, ऐतिहासिक शाहिद स्मारक "वीरगळ" भाडणे(साक्री) येथे गावाच्या मागच्या भागात दुर्लक्षित पडलेल्या दिसू...
09/05/2022

भारताचा प्राचीन इतिहास, ऐतिहासिक शाहिद स्मारक "वीरगळ" भाडणे(साक्री) येथे गावाच्या मागच्या भागात दुर्लक्षित पडलेल्या दिसून येतात,
हिंदुत्वाचा पाया भक्कम उभा करण्यासाठी या वीरांनी स्वतःला त्यात गाडून घेतले आहे, आणि आज काहीजण स्वतःचा हिंदुत्वाचा झेंडा उंच करण्यासाठी भांडताय मात्र या वीरांना विसरून कस चालेल,,?


03/03/2022

सकल मराठी रयतेचे पावनतीर्थ...देश सेवा, निष्ठा आणि त्यागाचे अखंड प्रेरणा स्रोत.... 【{पावनखिंड}】

ऐतिहासिक वास्तूंची श्रीमंती लाभलेला गाळणा किल्लासह्याद्री पर्वतातील सातमाळा पोटरांगेत गाळणा टेकड्यांमध्ये 'दुर्ग गाळणा' ...
31/01/2022

ऐतिहासिक वास्तूंची श्रीमंती लाभलेला गाळणा किल्ला

सह्याद्री पर्वतातील सातमाळा पोटरांगेत गाळणा टेकड्यांमध्ये 'दुर्ग गाळणा' • वसलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ अवघ्या २३ कि.मी. अंतरावर असलेला हा दुर्ग १३व्या शतकात अस्तित्वात आला असावा. त्यावेळी या किल्ल्याचा समावेश राठोडवंशीय बागुल यांच्या बागलाण या राज्यात होत असे. बहामनी व निजामशाही यांना देखील बागलाणवर वर्चस्व मिळविणे जमले नाही. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर दुर्ग गाळणा निजामशाहीचा एक भाग म्हणून ओळखला जाऊ लागला. सन १५१० ते १५२६ च्या दरम्यान गाळणा निजामानी जिंकून घेतला. सन १५२६ पर्यंत निजामशाहीच्या ताब्यातला गाळणा किल्ला बागलाणचा राजा बहिरजीने जिंकला. हुसेन निजामशाहने १९५५ मध्ये गाळणावर हल्ला करून गड जिंकला. त्यावेळी मोगलांनी खान्देश जिंकून निजामशाही गिळंकृत करण्याचे प्रयत्न चालविले होते. यावेळी शहाजी राजांनी मोगल बादशहाविरूद्ध पुकारले होते. गाळणा किल्ला परत शहाजीराजांच्या ताब्यात देण्याचा महमूदखानाचा विचार मोगल सुभेदार खान जमाल यास समजला, त्यानी गाळणा जवळील लळींगचा किल्लेदार मीर कासीम हरवी याची भेट घेऊन मेहमूदखानाचे मन वळविले व त्याला मोगलांचे चाकरीत आणले. त्यामुळे त्याने शहाजीराजांची माणसे गाळणा ताब्यात घेण्यासाठी आली असता त्यांना परत पाठवून गाळणा मोगलांच्या ताब्यात दिला.

७ ऑक्टोबर १६३२ रोजी नविन किल्लेदार म्हणून जाफरबेग बलुच याची नेमणूक केली गेली गाळणा हे खान्देशच्या सहा सरकारांपैकी एक होते व तत्पूर्वीच्या चार सरकारांपैकी एक सरकार होते. या सरकारात सात परगणे होते. १६७६ ते १७५२ या कालावधीत लष्करी बेग, महम्मद वारीस, अब्दुल कासीम, दिलेर हिंमत असे किल्लेदार गाळणावर होऊन गेले. १७५२ मध्ये मराठ्यांकडून पराभूत झाल्यावर निजाम सलाबतजंगने भालकीचा तह केला ज्यानुसार इतर गडांसोबत गाळणा मराठ्यांना मिळाला. पेशवे काळात मल्हारराव होळकर गाळणाचे किल्लेदार होते. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी गाळणा ताब्यात घेतला व गाळणाचे महत्व संपुष्टात आले मात्र गाळणा किल्ल्यावरील अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.

-पुष्पक निकम, मालेगाव

27/01/2022

Save Nature...Save world....

My super girl..🚲 makes music with wind..Just ride it...
30/12/2021

My super girl..🚲 makes music with wind..Just ride it...

On the Gate of Haven...
06/12/2021

On the Gate of Haven...


माझी मुलगी हिरकणी(वीरा) हिने 2 वर्ष 10 महिने 8 दिवस वयातच दि 28 नोव्हें2021 रोजी कळसुबाई पर्वत शिखर (१६४६मी) स्वतः ४.३०त...
02/12/2021

माझी मुलगी हिरकणी(वीरा) हिने 2 वर्ष 10 महिने 8 दिवस वयातच दि 28 नोव्हें2021 रोजी कळसुबाई पर्वत शिखर (१६४६मी) स्वतः ४.३०तासात सर केले.

https://youtu.be/4h5Su7_LPDA

महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर, 1646मीटर "कळसुबाई" शिखरावर, माझी हिरकणी(वीरा)
29/11/2021

महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर, 1646मीटर "कळसुबाई" शिखरावर, माझी हिरकणी(वीरा)

25/11/2021
एखाद्या सुळक्याच्या माथ्यावर आपल्या बाहू पसरून अंगावर येणाऱ्या जोरदार वाऱ्याला मिठी देण्यात जी मज्जा आहे ना भाई......ती ...
24/11/2021

एखाद्या सुळक्याच्या माथ्यावर आपल्या बाहू पसरून अंगावर येणाऱ्या जोरदार वाऱ्याला मिठी देण्यात जी मज्जा आहे ना भाई......

ती शब्दात व्यक्त नाही होत, त्या करता सुळका चढावा लागतो...

Address

Malegaon
423203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deccan Adventure Club - गिरीवीर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share