12/09/2026
*सत्य परेशान हो सकता है पराजित नही* 💪🏻
*दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी माननीय श्री जी श्रीकांत साहेब विभागीय आयुक्त यांच्याशी भेट*
माजलगाव नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक (3) मध्ये चांदणी ग्राउंड परिसरात नाली व रस्त्याचे काम सुरू असून सदरील काम निकृष्ट दर्जाचे व सर्रास बोगस काम सुरू असले बाबत या अगोदरच आम्ही निवेदन दिले उपोषणही केले परंतु संबंधित कामामध्ये ठेकेदार व कन्ट्रक्शन कंपनी हे जनतेच्या व अधिकाऱ्यांच्या कसलाही धाकस राहिलेला नाही असे भासुण बोगस काम सुरू होता आम्ही नगरपालिका सीओ उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना वेळोवेळी निवेदन देऊन कसलीही कार्यवाही संबंधित ठेकेदार व काही राजकीय नेते यांना फरक पडत नाही असे भासवीत होते आम्ही कायदेशीर लढा सुरू केला आम्हाला अंशतः यश ही आले आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांचा वेळ घेऊन भेटलो असता माननीय विभागीय आयुक्त यांनी सांगितले की संबंधित कामांमध्ये जो ही दोषी आढळेल यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
*जर मागण्या 16 सप्टेंबर पर्यंत मान्य न झाल्यास 17 सप्टेंबर रोजी पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्यात येईल.*
*हा लढा जनतेच्या विश्वासासाठी हा लढा विकासासाठी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच असेल पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही लढतोय.
*जयहिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान*