14/02/2025
आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी मस्साजोग येथे जाऊन स्वर्गीय संतोष (अण्णा) देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांची झालेली अत्यंत निर्घृण हत्या प्रकरणी कुटुंबासमवेत चर्चा केली व माझ्याकडून एक छोटीशी मदत म्हणून आणि आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी व कौटुंबिक सबंध या नात्याने एक कुटुंब प्रमुख म्हणून आज संतोष (अण्णा) देशमुख यांच्या पत्नी यांना श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था येथे नोकरी आणि श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस व कृषी उत्पन्न बाजार समिती केज यांच्याकडून पाच लाख 55 हजार रुपये छोटीशी मदत म्हणून आज देण्यात आली त्या समवेत मी व माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण तसेच अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश भैय्या आडसकर, रणजित आडसकर,अंकुशराव कलानी, कैलास पाटील, सुनील आबा देशमुख, दिलीप गुळभिले, तसेच समस्त ग्रामस्थ मस्साजोग यांची उपस्थिती होती.