20/04/2026
लातूर महानगरपालिकेच्या कारभारात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा
अभिनव प्रयोग!
काँग्रेसचे फेसबुक पेज Latur Municipal Corporation INC फॉलो करा
शांत, सुरक्षित, आणि सुसंस्कृत शहर म्हणून असलेला लातूरचा लौकिक राखला जाईल आणि महानगरपालिकेत पारदर्शक कारभार करून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल, असे आश्वासन देऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने लातूर महानगरपालिकेची निवडणूक एकत्र येऊन लढवली होती, लातूरच्या जनतेला काँग्रेस आणि आणि वंचित बहुजन आघाडीची विकासाभिमुख भूमिका भावल्यामुळे या दोन्ही पक्षाच्या आघाडीला निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.
स्पष्ट बहुमताच्या जोरावर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने लातूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली असून, पदाधिकारी निवडीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे, नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार घेऊन आत्ता प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे.
*जाहिरनाम्याची अंमलबजावणी*
महानगरपालिका निवडणूक काळात नागरिकांच्या सूचना घेऊन त्या आधारे काँग्रेस पक्षाने जनतेचा जाहीरनामा प्रसिद्धीस दिला होता. या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे, त्यामुळे महापालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व विकास कामांची पारदर्शक माहिती लातूरच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्याशी संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे... अधिकृत Facebook पेज सुरू करित आहोत. या पेजवरून
शासनाच्या विविध योजना, त्या योजनांच्या माध्यमातून हाती घेतलेली विकास कामे, त्यासाठी लागणाऱ्या निधीचा वापर आणि निर्णय प्रक्रियेची माहिती नागरिकांपर्यंत नियमितपणे पोहोचवली जाणार आहे.
*नागरिकांशी थेट संवाद*
निर्णय प्रक्रिया, विकास योजना आणि त्याची अंमलबजावणी याची माहिती जनतेला देण्यासोबतच, या फेसबुक पेजच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवादही साधला जाणार आहे.नागरिकांच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना आणि आपेक्षांची नोंदही येथे घेतली जाणार आहे. यासाठी Live sessions, Q&A आणि interactive posts चा वापर केला जाईल.
*युवक आणि महिलांचा सहभाग महत्त्वाचा*
रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सोयी सुविधांच्या प्रगतीचे व्हिज्युअल अपडेट्स, before-after पोस्ट्स आणि व्हिडिओद्वारे सादरीकरण केले जाईल.
महापालिकेच्या सर्वच उपक्रमात युवक आणि महिलांचा सहभाग वाढवणे हा प्रमुख उद्देश आहे, त्यामुळे युवकांसाठी रोजगारविषयक माहिती आणि महिलांसाठी सक्षमीकरणाच्या योजनांची माहिती येथे उपलब्ध करून दिली जाईल
एकंदरीत सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा केवळ प्रसिद्धीसाठी वापर न करता या व्यासपीठावर येणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत उत्तर देऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला जाईल.
नागरिकांचा विश्वास, सहभाग आणि अभिप्राय यावरच शहराच्या प्रगतीची दिशा ठरते याची जाणीव ठेवून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे काँग्रेस नेतृत्व आणि लातूर शहर महानगरपालिका काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी ठरवले आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने लातूर शहर अधिक प्रगत, स्वच्छ सुंदर आणि सक्षम, बनवूया.
लातूर शहर महानगरपालिकेच्या कारभारात प्रत्यक्ष जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुरू केले हे अधिकृत फेसबुक पेज सर्वांनी फॉलो करावे, नागरिकांनी आवश्यकतेनुसार आपले विचार आणि मत नोंदवून शहर विकास प्रक्रियेचे सक्रिय भागीदार बनावे ही विनंती.आपले हे अधिकृत Facebook पेज follow करा, आपले मत नोंदवा आणि शहर विकास प्रक्रियेचे सक्रिय भागीदार बनावे ही विनंती 🙏