Shubham Jatal

Shubham Jatal State General Secretary – Nationalist Youth Congress Sharadchandra Pawar
State Coordinator – Maha Vikas Aghadi (Youth)

22/08/2026
22/08/2026
22/08/2026

छात्रो की गुंजच्या निमित्ताने अख्खं पुणे आज राहुलमय झालं आहे

आजचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षाही ग्रँड होणार आहे.

भाजपा आणि संघी पिलावळीने कार्यक्रम फेल करण्यासाठी कितीही प्रयत्न केले, कितीही अडथळे आणले तरी कार्यक्रम तुमच्या नाकावर टिच्चून होणार! 💪🏻

तुम देख लेना आँखों से…
हम आयेंगे लाखों से! 🫵🏽🔥

21/08/2026

कडून डिसेंबर 2023 मध्ये account clerk पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु परीक्षा 16 महिन्यानंतर 10 जून 2025 रोजी झाली. निकाल व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ऑगस्ट 2025 मध्ये पार पडली. आता 1 वर्ष उलटून गेले तरी अद्याप अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. तरी CIDCO ने तत्काळ अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत कार्यवाही करावी...

21/08/2026

२०१८ पासून सारथीच्या कर्मचाऱ्यांची मानधन निश्चिती करण्यात आली असतानाही तुटपुंज्या पगारावर काम करावं लागत असल्याने हे कर्मचारी १९ ऑगस्टपासून पुण्यातील सारथीच्या मुख्य कार्यालयात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांचा ‘काम बंद’ आंदोलनाचा निर्णय हा केवळ वेतनाचा प्रश्न नाही, तर समान कामासाठी समान वेतन आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांचा लढा आहे. विद्यार्थ्यांसाठी सारथी, बार्टी, TRTI या महत्त्वाच्या संस्था असून ‘बार्टी’च्या धर्तीवर सारथीमध्येही वेतन देण्याच्या त्यांच्या मागणीवर शासनाने गांभीर्याने विचार करुन सकारात्मक तोडगा काढावा, ही विनंती!

#सारथी #सारथी_कर्मचारी_आंदोलन #समान_काम_समानवेतन #कर्मचारी_हक्क #कामबंद_आंदोलन

21/08/2026

सोनिया गांधी यांचे Belonging: A Journey of Love हे आत्मकथन १० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकाशित होत आहे. या पुस्तकात त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून राजकीय प्रवासापर्यंतच्या अनेक न सांगितलेल्या अनुभवांवर भाष्य करणार आहेत.

सहा दशकांचा भारत
एक आयुष्य
आणि असंख्य न सांगितलेल्या कहाण्या!

राजीव गांधींसोबतचं प्रेम, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींचा दुःखद अंत, त्यानंतर राजकारणात येण्याचा निर्णय, काँग्रेसचं नेतृत्व आणि पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय.

या सगळ्या घटनांकडे सोनिया गांधी स्वतःच्या नजरेतून काय पाहतात?

ज्यांच्या आयुष्याबद्दल गेली अनेक दशके इतरांनी लिहिलं, चर्चा केली, आरोप केले आणि कथा रचल्या
आता पहिल्यांदाच त्या स्वतःची कहाणी स्वतः सांगणार आहेत.

हे फक्त एका राजकीय नेत्याचं आत्मकथन नाही.

हे प्रेम, दुःख, संघर्ष, निष्ठा आणि भारताशी जोडल्या गेलेल्या एका विलक्षण प्रवासाची कहाणी आहे.

Belonging ची आतुरतेने वाट पाहतोय.

21/08/2026

सावित्रीच्या लेकींनो, तुमचा आवाज बुलंद करायला येत आहेत जननायक राहुल गांधी!

विद्यार्थिनींचे प्रश्न, शिक्षण आणि भविष्यावरील आव्हानांवर थेट संवाद साधण्यासाठी खास कार्यक्रम:
'छात्रों की गूंज'
प्रमुख उपस्थिती: श्री. राहुल गांधी (विरोधी पक्षनेते, लोकसभा)

स्थळ:AISSMS कॉलेज ग्राउंड, पुणे
दिनांक:२२ ऑगस्ट २०२६

- राहुल गांधी यांच्याशी थेट प्रश्नोत्तर आणि संवाद

- विद्यार्थिनींसाठी मोफत बस सेवा उपलब्ध

21/08/2026

झुकना पडा 💪

पेलेट गनमुळे जखमी झालेल्या तरुणाची FIR मागील एक महिन्यापासून अमित शहांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलीस दाखल करून घेत नव्हती.

पण आज राहुल गांधी ठाण मांडून बसले आणि अखेर सरकारला झुकावे लागले. FIR दाखल झाली

ही लढाई न्यायासाठी आहे, अन्यायाविरोधात आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी आहे.

16/08/2026

आदरणीय साहेब ❤️🙏

अनुभव बोलत असतो आणि पुढची पिढी तो ऐकत असते. अनुभवाच्या सावलीत विचारांची नवी दिशा घडत असते..!

अनुभवी नेतृत्वासोबत झालेला संवाद हा नेहमीच काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जातो. राजकारणातील चढ-उतार, समाजकारणाची दिशा, जनतेशी असलेलं नातं आणि बदलत्या राजकीय परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्यांचा अनुभव अशा संवादातून समृद्ध होत जातो.

ज्यांनी अनेक दशकांचा राजकीय प्रवास जवळून पाहिला आणि अनुभवला आहे, त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळणं ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. त्यांच्या अनुभवातून मिळणारे विचार आणि मार्गदर्शन पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरू शकते. अनुभवातून शिकत, विचारांमधून दिशा घेत आणि नव्या पिढीच्या ताकदीने पुढे जाण्याचा हा प्रवास असाच सुरू राहो. कारण नेतृत्व केवळ पदातून निर्माण होत नाही तर ते विचार, अनुभव, संवाद आणि सातत्याने घडत असतं..!

Address

Latur

Telephone

+919702403631

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubham Jatal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shubham Jatal:

Shortcuts

Share