Collector & District Magistrate, Latur

Collector & District Magistrate, Latur Official page of Collector & District Magistrate, Latur (Maharashtra State) India

30/05/2026

लातूर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून आगामी काळातही यात कोणताही खंड पडणार नाही, अशी हमी पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पेट्रोल पंप असोसिएशनचे पदाधिकारी व पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इंधनाच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्याला आवश्यक असणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू असून भविष्यातही हा पुरवठा असाच अखंडित सुरू राहील, अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.

ग्रामीण भागात सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा सतत उपलब्ध ठेवण्यात यावा आणि शेती मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना, तसेच उद्योग-व्यवसाय आणि जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात डिझेल तात्काळ उपलब्ध करून दिले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिल्या. पेट्रोलियम कंपन्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी प्रशासनाला दिली.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अतिरिक्त स्वरूपात पेट्रोल किंवा डिझेलची खरेदी करू नये. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करून पेट्रोल पंपांवरील अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन सर्व पेट्रोलियम कंपन्या व पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*****

Collector & District Magistrate, Latur

25/05/2026

DIC/ KVIB has not engaged any private Party/Agency/ Middlemen/ Franchise etc for promoting or sanctioning of CMEGP Projects or any financial assistance under CMEGP and any potential entrepreneurs/beneficiaries dealing with such agency shall be doing it at their own risk and consequences.

25/05/2026

वृक्ष लागवडीचे पहिले पाऊल ‘लँड बँक’

वृक्ष लागवडीसाठी मनरेगा अंतर्गत महिला बचत गटांची घेतली जाणार मदत !

#लातूर
#वृक्षारोपण

"हरित महाराष्ट्र" संकल्प पूर्तीसाठी लातूर जिल्हा प्रशासनाचे पाऊल! **लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात (रोहयो विभाग) / सामाजि...
21/05/2026

"हरित महाराष्ट्र" संकल्प पूर्तीसाठी लातूर जिल्हा प्रशासनाचे पाऊल!
**लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात (रोहयो विभाग) / सामाजिक वनिकरण महत्त्वाची आढावा बैठक संपन्न!**
राज्य शासनाच्या वतीने **सन २०१६-२०१७** या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात **३०० कोटी वृक्षलागोवड अभियान** राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या भव्य मोहिमेच्या नियोजनासाठी आणि संनियंत्रणासाठी **“हरित महाराष्ट्र आयोग”** स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
याच धर्तीवर, आगामी **२०१६ च्या पावसाळ्यात** मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या संदर्भातील आवश्यक नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ आणि विभागनिहाय कृती आराखडा (Action Plan) तयार करण्यासाठी **मा. जिल्हाधिकारी, लातूर** यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीला लातूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, प्राधिकरणांचे प्रतिनिधी आणि तहसीलदार उपस्थित होते.
**चला, आपण सर्वांनी मिळून या पावसाळ्यात वृक्षलागवड करूया आणि आपल्या लातूरला अधिक हिरवेगार व सुंदर बनवूया!** 🌳✨
#पर्यावरणरक्षण #वृक्षलागवड२०१६ #लातूरकर

लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा, स्वच्छता व जल जीवन मिशन अंतर्गत विविध योजनांच्या आढाव्यासाठी जिल्हा समितीची बैठक मा. जिल्ह...
21/05/2026

लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा, स्वच्छता व जल जीवन मिशन अंतर्गत विविध योजनांच्या आढाव्यासाठी जिल्हा समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा, जल जीवन मिशन कामांची प्रगती, पाणी गुणवत्ता, स्वच्छता उपाययोजना तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

“प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी आणि स्वच्छतेची सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध.”

एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात जलसंधारण व पाणी संवर्धन कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिका...
21/05/2026

एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात जलसंधारण व पाणी संवर्धन कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उद्योग समूह व कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत CSR निधी संदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जलसुरक्षा, पाणीटंचाई प्रतिबंध व शाश्वत जलव्यवस्थापनासाठी उद्योगांच्या सक्रिय सहभागाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
“पाणी संवर्धन हीच भविष्यातील जलसुरक्षेची गुरुकिल्ली”
#लातूरडिस्ट्रिक्ट

21/05/2026

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर #लातूर जिल्ह्यात वैरण विकास योजना अंतर्गत चारा बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान

२८ मे पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

21/05/2026

जल जीवन मिशनच्या कामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणेला निर्देश

#लातूर #जलजीवनमिशन

28/04/2026

Address

Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector & District Magistrate, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Collector & District Magistrate, Latur:

Share