Aayush Sevabhavi Sanstha - आयुष सेवाभावी संस्था

  • Home
  • India
  • Kupwad
  • Aayush Sevabhavi Sanstha - आयुष सेवाभावी संस्था

Aayush Sevabhavi Sanstha - आयुष सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील

आयुष सेवाभावी संस्था
१आयुष हेल्पलाईन टीम" च्या माध्यमातून अपघात ग्रस्तांना मोफत तात्काळ सेवा. आपत्कालीन पथका द्वारे मदत
२आयुष ब्लड हेल्पलाईन टीम माध्यमातून SDP डोनेशन व रक्त दान
३मोफत रूग्नोपयोगी साहित्य केंद्र
४गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
५वृक्ष लागवड आणि संवर्धन
६आयुष रूग्ण मदत क्रेद्र
७गरीब व गरजू विद्यार्थ्यांन शैक्षणिक दत्तक
८ मोफत आरोग्य शिबीर
९आपल्या घरातील कचऱ्यापासून कंपोस

्टिंग करण्यावर मार्गदर्शन
१०आयुष मानसिक स्वस्थ्य हेल्पलाईन
११ आयुष अत्याधुनिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका
http://www.aayushsanstha.com
9764976888, 8275376889

09/03/2026

🎯 अशक्य काहीच नाही: फक्त मनाचा 'निश्चय' हवा!
​कधीकाळी घराबाहेर छोट्या कामाला जायचं म्हटलं तरी सायकल किंवा मोटरसायकल लागायची... साध्या दोन पावल चालण्याचाही कंटाळा यायचा. पण आज जेव्हा मी १५ किलोमीटर धावण्याचे लक्ष्य पूर्ण केले, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली — "शक्तीपेक्षा 'इच्छाशक्ती' मोठी असते!"
​सुरुवातीला स्वतःलाच हे पटेल का असं वाटलं होतं, पण जेव्हा मनात ठाम निर्णय घेतला आणि आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाकले, तेव्हा अंतर आपोआप कमी होत गेले.
​या प्रवासातून मी काय शिकलो?
​मनाचा निर्णय: जोपर्यंत मन तयार होत नाही, तोपर्यंत शरीर साथ देत नाही. एकदा का मनाने ठरवलं की मार्ग सापडतोच.
​आत्मविश्वास: स्वतःवर ठेवलेला विश्वास अर्धी लढाई जिंकून देतो.
​सातत्य: छोट्या कामांचा कंटाळा करणारा माणूसही सरावाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो.
​आपण ठरवलं तर सर्व काही शक्य आहे, हे १५ किमी धावल्यानंतर आज अधिक स्पष्टपणे समजलं. हा फक्त धावण्याचा प्रवास नाही, तर स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रवास आहे! 💪🏃‍♂️
​ WillPower निश्चय

06/03/2026
19/02/2026

निश्चयाचा महामेरू... शौर्याचा महासागर! 🚩
​छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज १८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी १०.४५ किमी धावून महाराजांना अनोखी मानवंदना दिली. 🏃‍♂️
​शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नेहमीच शिस्त, जिद्द आणि परिश्रमाची शिकवण देतो. ही धाव त्याच जिद्दीला आणि 'रयतेच्या राजाला' मानाचा मुजरा! 🚩🔥
​ #शिवजयंती

09/06/2022

#अपघातग्रस्तांसाठी_आयुष_हेल्पलाईन_टीम_नेहमी_तत्पर .
आयुष कार्डियक रुग्नवाहिका सांगली येथून रुग्ण घेऊन मुंबईला सोडून सांगलीला परत येत असताना खंबाटगी घाटामध्ये बसला विरुद्ध दिशेने येऊन राहुल पाढकर वय वर्ष ३० हे धड़कून अपघात होऊन जखमी झाला यावेळी क्षणाचाही विलंब न करता आयुष कार्डियक रुग्नवाहिकेचे व्यवस्थापक सुरज शेख व ब्रदर प्रकाश पांढरे यांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तीवर रुग्नवाहिकेमध्ये प्रथमोउपचार कले व सदर अपघातग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असलेने पुढील उपचारासाठी मानसी रुग्णालय खंबाटगी घाट सातार येथे दाखल केले सदर रुग्नवाहिका सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आली. यावेळी पोलीस व नागरिक मदतीला उपस्थित होते.
दिंनाक :- ९ जून २०२२
#गाडी_सावकाश_चालवा_वाहतूकीचे_नियम_पाळा

आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सां-मि-कु महानगरपालिकेच्या वतीने महाविद्यालय शिवाजी नगर मिरज यांच्या ...
27/01/2022

आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सां-मि-कु महानगरपालिकेच्या वतीने महाविद्यालय शिवाजी नगर मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, कन्या महाविद्यालयात स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२, माझी वसुंधरा अभियानांतर्गत सां.मि.कु. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा.श्री दत्तात्रय लांघीसर, आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटेसर, वरिष्ठ स्वछ्ता निरिक्षक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आयुष सेवाभावी संस्थेचे सौ. संपदा पाटील यांनी घरामध्ये कंपोष्ट ( home composting) करण्या बाबत प्रात्यक्षिक आणि माहीती दिली या वेळी मिरजेचे श्री. हिमांशु लेले यांनी घरातील कचरा पासून गॅस तयार करण्यावर मार्गदर्शन केले
दिनाक :- २७-०१-२०२२
Aayush Helpline Tim call 9595882288
#आयुषमातिविरहितबागप्रेमीटीम #आयुषसर्पमित्र #आयुषमानसिकस्वस्थ्यहेल्पलाईन #आयुषलाईफसपोर्टॲम्बुलन्स
#आयुषअत्याधुनिकरुग्णवाहिका

Address

कुपवाड
Kupwad
416435

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aayush Sevabhavi Sanstha - आयुष सेवाभावी संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aayush Sevabhavi Sanstha - आयुष सेवाभावी संस्था:

Share