जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर Page Designed and Published By DIO, Kolhapur

- महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे.
- दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे.
- शासकीय जाहिरातीचे वितरण करणे.
- राज्य शासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे.
- राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.

23/07/2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात दिनांक २८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय हे सुध्दा उपस्थित राहण्याची शक्यता असून दौ-या दरम्यान संरक्षित व्यक्तिंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सावित्री मिनरल वॉटर प्लांट ऑफ सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था, शोभाताई कोरे वारणानगर, महिला गृह उद्योग लिज्जत पापड ब्रँच वारणानगर कोडोली, विमानतळ, श्री अंबाबाई/ महालक्ष्मी मंदीर, शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी घातली आहे.
***

23/07/2024

जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 7.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे व आंबर्डे, वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी व गिजवणे, घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण 78 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 7.36 टीएमसी, तुळशी 2.62 टीएमसी, वारणा 28.15 टीएमसी, दूधगंगा 16.72 टीएमसी, कासारी 2.04 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 1.89 टीएमसी, पाटगाव 3.26 टीएमसी, चिकोत्रा 0.90 टीएमसी, चित्री 1.82 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 40.8 फूट, सुर्वे 38.4 फूट, रुई 68 फूट, इचलकरंजी 64 फूट, तेरवाड 57.6 फूट, शिरोळ 56.6 फूट, नृसिंहवाडी 53 फूट, राजापूर 41.5 फूट तर नजीकच्या सांगली 27 फूट व अंकली 31.6 फूट अशी आहे.
***

22/07/2024

सीपीआर येथील सात मॉडयुलर ऑपरेशन थिएटर्स, सी. एस.एस. डी व नॅट मशीनचा लोकार्पण सोहळानंतर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ

एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरसाठी दिलेल्या 1200 कोटींच्या निधीमधून गोरगरिब रुग्णांची सेवा करण्याची संध...
22/07/2024

एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरसाठी दिलेल्या 1200 कोटींच्या निधीमधून गोरगरिब रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली
– पालकमंत्री हसन मुश्रीफ

अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांयुक्त 7 शस्त्रक्रिया गृहे, निर्जंतुकीकरण विभाग आणि नॅट मशीनचे लोकार्पण

शेंडा पार्क येथील 1100 खाटांच्या रुग्णालय भूमिपूजनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर येथे येणार

कोल्हापूर, दि.22 : एका वर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर)साठी 1200 कोटींच्या निधीमधून गोरगरिब रुग्णांची सेवा करण्याची संधी माझ्या जन्मभूमीत मिळाली असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर येथील 7 मॉड्युलर ऑपरेशन थेटर्स, अत्याधुनिक मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग आणि रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ, टाईप बी आणि टाईप सी या अत्याधुनिक, तंतोतंत व जलद टेस्टसाठी आवश्यक असणाऱ्या नॅट मशीनचे लोकार्पण तथा उद्घाटन संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी कृष्णराज महाडिक, अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर मीरगुंडे उपस्थित होते. मागील काही वर्षात बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था झाल्याचे आपण पाहिले आहे. आता शेंडा पार्क येथे सुसज्ज असे 1100 खाटांचे रुग्णालय होत आहे. या नवीन इमारतीचे बांधकाम होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. तोपर्यंत येथील महाविद्यालयाची इमारत व सीपीआर हॉस्पिटलची आवश्यक दुरुस्ती करून चांगल्या प्रकारे ती इमारत तयार करून भविष्यात ती जिल्हा रुग्णालय वापरणार आहे. शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या आवारात 10 हजार लोकसंख्येची वैद्यकीय नगरीच उभी राहील असे त्यांनी मत व्यक्त केले.

शेंडा पार्क येथील 1100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले असून ते ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर येथे येणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 1100 खाटांच्या रुग्णालयामध्ये 600 खाटा सामान्य रुग्णांसाठी असतील, 250 खाटा कॅन्सर रुग्णांसाठी तर 250 या सुपर स्पेशलिटीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मुला मुलींचे वसतिगृह, ऑडिटोरियम हॉल, मॉर्चुरी कक्ष इत्यादी कामांचे भूमिपूजनही गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे असे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाअगोदर त्यांनी शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करून सभेच्या ठिकाणी भेट दिली व अमित शहा यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना बांधकाम विभागाला दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेगवेगळ्या कामांचे लोकार्पण झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या कामाचे कंत्राटदार, अधिष्ठाता व संबंधित डॉक्टर यांना धन्यवाद दिले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, शेंडा पार्क येथील नवीन इमारतीचे काम होईपर्यंत येथील हेरिटेज इमारतीचे संवर्धन करणे तसेच या ठिकाणी येत असलेल्या रुग्णांना सेवा देणे हे काम सर्वांना मिळून करावे लागेल. येथील नूतनीकरणासाठी व दुरुस्तीसाठी 46 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था, येथील ड्रेनेज लाईनची व्यवस्था तसेच स्वच्छता केली जाईल.

एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरसाठी 1200 कोटीं निधी
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एका वर्षात दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी व नवीन आवश्यक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी जवळपास बाराशे ते तेराशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. यामध्ये राज्य योजनेअंतर्गत संस्थेचे अद्यावतीकरण व यंत्रसामग्री करता 267 कोटी, राज्य योजनेअंतर्गत बांधकामा करिता एकूण 799 कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून 22.86 कोटी रुपये निधी, कागल येथील 100 खाटांचे रुग्णालय, उत्तुर आजरा येथील 50 खाटांचे रुग्णालय, सांगाव कागल येथे 100 खाटांचे आरोग्य पथक यासह यंत्रसामुग्री साठी 237.14 कोटी देण्यात आले आहेत.

22/07/2024

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास
नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे
- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर जावून पाणी धोका पातळीकडे सरकत आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सन 2021 साली कोल्हापूर शहरामध्ये महापुराचे पाणी आलेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. त्यावेळी पूर पातळी वाढत जाईल त्यानुसार शहरात काही ठिकाणी महापुराचे पाणी आले होते.
पूर पातळी व शहरातील पुराचे पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत -
43 फूट- सुतारवाडा
45 फूट- जुने शिये नाका ओढ्यावर पाणी येवून बावडा रस्ता बंद
45 फूट- रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा बटाटा मार्केट शाहूपुरी कोंडा ओळ
46 फूट 5 इंच- व्हिनस कॉर्नर, व्हिनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा, पोलो ग्राऊंड
47 फूट 2 इंच- पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लब, शुक्रवार पेठ पश्चिम बाजू
47 फूट 2 इंच- आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा व शिंगणापूर रस्ता बंद
47 फूट 4 इंच- शाहूपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोधा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत येथे पाणी येते.
47 फूट 5 इंच- रेणुका मंदिर गुंजन हॉटेल, त्रिंबाली नगर, रेणुका नगर, घाडगे गृहयोग व रेणुका मंदिर पिछाडीस पाणी येते. माळी मळा, मेडिकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक मळा, पॅलेस पिछाडीस, राजहंस प्रिंटिंग प्रेस, हरिपूजा पुरम
* त्रिकाणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद
* केव्हिज पार्क, दीप्ती पार्क, डायमंड हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल
* खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद
* जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज वाया पाटलाचा वाडा रस्ता बंद
* बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद
* भालजी पेंढारकर हॉल परिसर (महावीर गार्डन दक्षिण बाजू)
* दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद
*दुर्गा मंदिर (लक्षतीर्थ वसाहत )
47 फूट 5 इंच- विलसर पूल ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद
* लक्ष्मीपुरी ते नाईक अँड नाईक कंपनी रस्ता बंद
*गवत मंडई रस्त्याची पश्चिम बाजू पाण्यात

47 फूट 7 इंच- सुभाष रोड (टायटन शोरुम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद
47 फूट 8 इंच- पिनाक, सनसिटी, माळी मळा, महावीर कॉलेज पिछाडिस, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपार्टमेंट, ड्रिम वर्डची मागील बाजूस
48 फूट - मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद
* काटे मळा ते सफायर पार्क रस्ता बंद
* मेनन बंगला ते शेळकेसो नगरसेवक घरासमोरील रस्ता बंद
48 फूट 8 इंच- शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पिटल रस्त्याची पश्चिम बाजू पूर्ण पाण्यात )
* उषा टॉकिज (बी न्युज ऑफिस ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद (स्टेशन रोड)
49 फूट 11 इंच- घोडकेवाडी, मुक्त सैनिक वसाहत पूर्व बाजू, एमएसईबी, बापट कॅम्प, कदमवाडी, गणेश पार्क
51 फूट - दुधाळी (कोल्हापूर ऑर्थोपेडीक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कूल) उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राऊंड परिसर
51 फूट 8 इंच- कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्ता बंद
53 फूट - बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग पाण्यात (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपुरी)
55 फूट 7 इंच- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंदाजे 3 ते 4 फुट पाणी होते व जिल्हाधिकारी कार्यालय समोरील भाग (नागाळा पार्क) पुराचे पाणी आले आहे.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 7.02 टीएमसी पाणीसाठा आहे. सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून एकूण 78 बंधारे पाण्याखाली आहेत.
***

22/07/2024

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करा

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २६ जुलै २०२४ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ताराराणी पुतळ्या जवळ, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडाळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड, व आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करावीत. दिलेल्या मुदतीनतंर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
***

22/07/2024

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु
पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने, नियमानुसार व पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविली जात असून प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल, संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के कोट्यातील विद्याथों प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील आरटीई पोर्टल या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत जिल्ह्यातील 325 शाळांमधील 3 हजार 32 जागांसाठी एकूण 3 हजार 894 ऑनलाईन अर्ज पालकांकडून प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) दि. 7 जून 2024 रोजी आयुक्त (शिक्षण) पुणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती. तथापि, उच्च न्यायालय, मुंबई येथे काही संस्थांनी जनहित याचिकांद्वारे हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली नव्हती. सध्या उच्च न्यायालय, मुंबई यांनी या जनहित याचिकांवर 19 जुलै 2024 रोजी अंतिम निर्णय दिला आहे. त्यानुसार दि. 7 जून 2024 रोजी काढण्यात आलेल्या ऑनलाईन सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दि. 20 जुलै 2024 राजी आरटीई पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रथम प्रवेश फेरीसाठी निवडलेल्या पालकांच्या मोबाईलवर दि. 22 जुलै 2024 पासून शाळेच्या नावासह SMS पाठविण्यात येत आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अथवा सिलेक्टेड च वेटिंग लिस्ट या टॅबवर जाऊन आपल्या फॉर्म नंबरद्वारे अर्जाची स्थिती पहावी व पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अलोटमेंट लेटर सह दि. 23 ते दि. 31 जुलै 2024 या कालावधीत पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी केंद्राकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन पडताळणी समितीमार्फत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. विहीत कालावधीत प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. ज्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल अशा अर्जासाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
***

22/07/2024

महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. ज्या महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल. कोणत्याही महाविद्यालयाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये. तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
***

22/07/2024

कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयं माहिती प्रणालीत मान्सून काळात जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती whats app वर मिळू शकते..

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी 9209269995 हा मोबाईल क्रमांक कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा, व्हॉटसअप वरुन या नंबरवर 1 ते 6 पैकी क्रमांक मेसेज करावेत. यावर पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इ. बाबतची सर्व माहिती मिळेल..

उदा. आपल्याला पर्जन्यमानाबाबत माहिती हवी असेल तर 1 असा रिप्लाय करा.

1. पर्जन्यमान (Rainfall)

2. धरण व पाणी पातळी अहवाल (Water Level Information)

3. पंचगंगा पाणी पातळी (Panchaganga River Water Level)

4. महत्वाचे संदेश (Important Messages)

5. आपत्कालीन संपर्क क्रमांक (Emergency Contact)

6. रस्ते व वाहतूक (Road and Transport)

7.पुर पातळी नुसार पाणी भागात येण्याची संभाव्य ठिकाणे..

22/07/2024

कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयं माहिती प्रणालीत मान्सून काळात जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती whats app वर मिळू शकते..

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी 9209269995 हा मोबाईल क्रमांक कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा, व्हॉटसअप वरुन या नंबरवर 1 ते 6 पैकी क्रमांक मेसेज करावेत. यावर पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इ. बाबतची सर्व माहिती मिळेल..

उदा. आपल्याला पर्जन्यमानाबाबत माहिती हवी असेल तर 1 असा रिप्लाय करा.

1. पर्जन्यमान (Rainfall)

2. धरण व पाणी पातळी अहवाल (Water Level Information)

3. पंचगंगा पाणी पातळी (Panchaganga River Water Level)

4. महत्वाचे संदेश (Important Messages)

5. आपत्कालीन संपर्क क्रमांक (Emergency Contact)

6. रस्ते व वाहतूक (Road and Transport)

7. पुर पातळी नु

Address

जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर:

Share