18/07/2026
🏗️ खारघरसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 🐾
आज पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर, सेक्टर-१४ येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण तसेच आधुनिक प्राणी अंत्यसंस्कार केंद्र (Animal Crematorium) उभारणीचे भूमिपूजन मा. आमदार श्री. प्रशांत ठाकूर जी यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या दोन्ही प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध होणार असून, खारघरच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.
या कार्यक्रमास मा. महापौर श्री. नितीन पाटील जी, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेचे, सर्व लोकप्रतिनिधींचे, अधिकारी व या प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 💐
स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आधुनिक खारघरच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल! 🌿