Digvijay Bagal Fc

Digvijay Bagal Fc महायुती उमेदवार २०२४ |करमाळा माढा विधानसभा
मा चेअरमन मकाई सह सा कारखाना
मा जिल्हा नियोजन समिती सदस्य
सह अध्यक्ष,मुख्यमंत्री पाणंद रस्ता समिती

स्व. दिगंबरराव बागल मामा यांचे जुने सहकारी श्री. विजय पवार यांनी नवीन मोटरसायकल घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ...
28/08/2026

स्व. दिगंबरराव बागल मामा यांचे जुने सहकारी श्री. विजय पवार यांनी नवीन मोटरसायकल घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
यावेळी नवीन बुलेटवर स्वतः दिग्विजय बागल यांनी गाडी चालविण्याचा आनंद घेतला… 🏍️💨
स्व मामांच्या जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या आठवणी आणि आपुलकीचा हा क्षण कायमच खास! ❤️

राखी म्हणजे केवळ मनगटावर बांधलेला धागा नाही,तर भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या अतूट साथिचे प्रत...
28/08/2026

राखी म्हणजे केवळ मनगटावर बांधलेला धागा नाही,
तर भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या अतूट साथिचे प्रतीक आहे. ❤️
या पवित्र नात्याचा सन्मान करत
सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि समाधान सदैव नांदो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏

👑 संकटात धावून येणारा, प्रत्येकाच्या हाकेला धावणारा आपला हक्काचा भाऊ — मा. दिग्विजय बागल! 🚩❤️भाऊ असावा तर असा... जो फक्त...
27/08/2026

👑 संकटात धावून येणारा, प्रत्येकाच्या हाकेला धावणारा आपला हक्काचा भाऊ — मा. दिग्विजय बागल! 🚩❤️

भाऊ असावा तर असा... जो फक्त बोलत नाही, तर संकटाच्या वेळी ढाल बनून पाठीशी ठाम उभा राहतो! 🤝

आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे पार पडलेला रक्षाबंधन सोहळा केवळ एक सण नव्हता, तर युवा नेते मा. दिग्विजय बागल यांच्यावरील जनतेच्या आणि तरुण पिढीच्या अफाट विश्वासाची साक्ष ठरला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने भाऊंना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेद न ठेवता, मुस्लिम भगिनींनीही अत्यंत आपुलकीने मा. दिग्विजय बागल यांना राखी बांधून 'हक्काचा भाऊ' म्हणून मान दिला. हा क्षण सामाजिक एकात्मतेचा नवा आदर्श ठरला!
🌿 केवळ मानवी नात्यांचाच नव्हे, तर निसर्गाचाही आदर करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी झाडांना राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
"तुम्ही फक्त हाक मारा, तुमचा भाऊ धावून येईल!" — दिग्विजय बागल
विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधताना भाऊंनी अत्यंत प्रेरणादायी शब्द मांडले:

"आई-वडिलांचे संस्कार आणि गुरुजनांची शिकवण हाच तुमचा खरा वारसा आहे. कोणतीही अडचण किंवा संकट असो, थेट मला फोन करा; तुमचा हक्काचा मोठा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन!"
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, यश कल्याणीचे श्री. गणेश करे पाटील, एल. टी. राख सर, उपप्राचार्य संभाजी किरदाक, विद्या विकास मंडळाचे चेअरमन प्राचार्य मिलिंद फंड सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. मुक्ता काटवटे मॅडम यांनी केले.

नेतृत्व असं असावं, ज्याच्यावर प्रत्येकाला अभिमान वाटावा!
भाऊ, तुमची हीच आपुलकी आणि जनसेवा आम्हाला नेहमी प्रेरणा देते! 💐🙏

पोथरे ता करमाळा येथील कै दिलीपअण्णा शिंदे यांचे नुकतेच अकाली दुःखद निधन झाले. भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल या...
27/08/2026

पोथरे ता करमाळा येथील कै दिलीपअण्णा शिंदे यांचे नुकतेच अकाली दुःखद निधन झाले. भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी आज शिंदे कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले

दौऱ्याच्या निमित्ताने साडे, ता. करमाळा येथे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा युवा नेते मा. दिग्विजय बागल यांची प्...
27/08/2026

दौऱ्याच्या निमित्ताने साडे, ता. करमाळा येथे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा युवा नेते मा. दिग्विजय बागल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावातील विविध प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी दहिगाव उपसा पाणीपुरवठा योजना, रस्ते, तसेच इतर आवश्यक विकासकामांबाबत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचा विश्वास मा. दिग्विजय बागल यांनी ग्रामस्थांना दिला.
गावाच्या विकासासाठी सदैव सकारात्मक भूमिका घेत ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

मौजे साडे ता करमाळा येथील हरिनाम सप्ताह समाप्तीच्या निमित्ताने श्री काल्याच्या कीर्तनात भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्वि...
27/08/2026

मौजे साडे ता करमाळा येथील हरिनाम सप्ताह समाप्तीच्या निमित्ताने श्री काल्याच्या कीर्तनात भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी उपस्थित राहून किर्तन श्रवणाचा लाभ घेतला .
यावेळी मा दिग्विजय बागल यांचा बळीराजा शेत पानंद रस्ते समितीच्या सहअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साडे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री शहाजी अश्रू शेळके,बिटरगाव श्री यांच्या नूतन वास्तूच्या वास्तुशांत समारंभा निमित्त भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विज...
26/08/2026

श्री शहाजी अश्रू शेळके,बिटरगाव श्री यांच्या नूतन वास्तूच्या वास्तुशांत समारंभा निमित्त भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी आज सदिच्छा भेट दिली व नूतन वास्तूमध्ये शेळके परिवाराची प्रगती व भरभराट होवो अशा सदिच्छा दिल्या.

करंजे ता करमाळा येथील श्री मारुती श्रीरंग सरडे यांचे नूतन वास्तूच्या वास्तुशांत समारंभ निमित्त भाजपा जिल्हा युवा नेते  म...
26/08/2026

करंजे ता करमाळा येथील श्री मारुती श्रीरंग सरडे यांचे नूतन वास्तूच्या वास्तुशांत समारंभ निमित्त भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी सदिच्छा भेट दिली व नूतन वास्तूच्या वास्तुशांती समारंभ निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी सरडे परिवाराच्या वतीने मा दिग्विजय बागल यांचा सत्कार करण्यात आला.

Address

A/P Mangi, Tal. Karmala, Solapur
Karmala
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digvijay Bagal Fc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Digvijay Bagal Fc:

Shortcuts

Share