18/07/2026
🚩 १८ ते २४ जुलै दरम्यान नगरसेवक अमित धाक्रस यांच्या पुढाकारातून भव्य 'मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर' सुरू! 🚩
प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक श्री. अमित महेश्वर धाक्रस यांच्या वतीने आजपासून भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी या सुविधेचा भरघोस लाभ घेतला! 🏥✨
🗓️ दिनांक: १८ जुलै ते २४ जुलै २०२६
⏰ वेळ: दुपारी २.०० ते सायंकाळी ६.००
📍 स्थळ: जनसंपर्क कार्यालय, शंकर प्रसाद पॅराडाईज, पारनाका, कल्याण (प.)
🩺 शिबिरामध्ये उपलब्ध मोफत सुविधा:
एम.डी. फिजिशियन डॉक्टरांकडून सर्वसाधारण आरोग्य तपासणी 🩺
ब्लड प्रेशर (BP) व नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी 👁️
मोफत रक्त तपासण्या (CBC, शुगर, थायरॉईड) 🩸
पात्र रुग्णांसाठी मोफत डोळ्यांचे ऑपरेशन व शासकीय योजनांतर्गत कॅन्सर उपचारासाठी मदत.
सहभागी हॉस्पिटल्स: ACE Hospital, ASG Eye Care, Esha Netralaya.
🚨 नागरिकांना आवाहन: शिबिरात प्रवेश व नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. तरी २४ जुलैपर्यंत सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची वेळेवर तपासणी करून घ्यावी! 🤝
📞 संपर्कासाठी: 7066555569 / 9869181866 / 8655711497
KalyanWest Parnaka KDMC BJPKalyan Prabhag8 MonsoonHealth