वीर प्रतिष्ठान संघटना - Veer Pratishthan Sanghatana

  • Home
  • India
  • Kagal
  • वीर प्रतिष्ठान संघटना - Veer Pratishthan Sanghatana

वीर प्रतिष्ठान संघटना - Veer Pratishthan Sanghatana Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वीर प्रतिष्ठान संघटना - Veer Pratishthan Sanghatana, Social service, AT Post-Bolavi, Tal-Kagal, , Dist-Kolhapur-416218., Kagal.

आमचे बंधू व बोळावी गावचे सुपुत्र *श्री अरुण भैरू पाटील* मुंबई पोलीस यांना *पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई* यांच्...
15/08/2026

आमचे बंधू व बोळावी गावचे सुपुत्र *श्री अरुण भैरू पाटील* मुंबई पोलीस यांना *पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई* यांच्याकडून *उत्कृष्ट सेवापदक* मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या निस्सीम प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि कर्तव्यतत्परतेमुळेच हा मानाचा टप्पा गाठला गेला आहे. भविष्यातील पुढील वाटचालीस आणि यशस्वी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा!✨🎉💥💫💐💐🏅

🌹मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!🌹श्री. विलासराव परसू कांबळे साहेब यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लजच्या उप...
14/08/2026

🌹मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!🌹

श्री. विलासराव परसू कांबळे साहेब यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लजच्या उपसभापती ( *Vice Chairman* ) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐🎉

आपल्या कार्याची दखल घेत मिळालेली ही जबाबदारी आपल्या नेतृत्वगुणांना मिळालेली योग्य पावती आहे. आपल्या कुशल नेतृत्वाखाली बाजार समितीचा विकास, शेतकरी बांधवांचे हित आणि परिसराची प्रगती यांना निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.

आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपल्या हातून शेतकरी हिताचे व समाजोपयोगी कार्य अधिकाधिक घडो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🙏

🎊 हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 🎊
*शुभेच्छुक - वीर प्रतिष्ठान संघटना*🚩

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक ज...
04/08/2026

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील एक प्रेरणादायी पर्व संपले आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याचा त्यांचा ध्यास, लोकहितासाठीची त्यांची अखंड तळमळ आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे उल्लेखनीय योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरत राहतील, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.

साधेपणा, दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांशी जपलेले आत्मीय नाते यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे कर्तृत्व आणि विचार भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरतील.

डॉ. डी. वाय. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.

#भावपूर्ण_श्रद्धांजली

भारतीय संगीतविश्वातील एक अमूल्य स्वर काळाच्या पडद्याआड…स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकण...
12/04/2026

भारतीय संगीतविश्वातील एक अमूल्य स्वर काळाच्या पडद्याआड…

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकणारी आहे. त्यांच्या सुरांनी केवळ गाणी नाही, तर अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या. शास्त्रीय संगीताची बांधिलकी आणि आधुनिकतेची झेप यांचा अप्रतिम संगम त्यांच्या प्रत्येक गाण्यात जाणवत असे.

सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या स्वरांनी भारतीय संगीताला समृद्ध केले. विविध भाषांमध्ये, विविध शैलींमध्ये त्यांनी सादर केलेली गाणी ही केवळ कलाकृती नसून ती काळाच्या पलीकडे जाणारी आठवण आहेत. प्रत्येक सुरात त्यांनी जीव ओतला आणि प्रत्येक गाण्याला आत्मा दिला—हीच त्यांची ओळख.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, विनम्रता आणि कलेप्रती असलेली अपार निष्ठा प्रत्येकाला प्रेरणा देणारी होती. इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचूनही त्यांनी जमिनीशी असलेले नाते कायम जपले—हीच त्यांची खरी महानता.

आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर, त्यांची परंपरा आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा सदैव जिवंत राहील. त्यांच्या आवाजाची जादू काळाच्या पलीकडेही तितकीच ताजी राहील.

आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

#भावपूर्ण_श्रद्धांजली

अभिमान! गर्व! विजय! 🇮🇳🏆टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेते - टीम इंडिया..!!अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या वाघांनी पु...
09/03/2026

अभिमान! गर्व! विजय! 🇮🇳🏆

टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेते - टीम इंडिया..!!

अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या वाघांनी पुन्हा एकदा मैदान मारलंय. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे..!!
जय हिंद 🇮🇳


आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.  #भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏
09/02/2026

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.

#भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏

भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐  #भावपूर्णश्रद्धांजली  #महाराष्ट्र  #नेतृत्व  #शोक
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐

#भावपूर्णश्रद्धांजली #महाराष्ट्र #नेतृत्व #शोक

आभार 🙏🙏🙏     आम्ही वीर प्रतिष्ठान संघटनेने मा श्री सागर ज्ञानदेव माने (लोकनियुक्त सरपंच) याच्याकडे सीसीटीवी कॅमेरा बसविण...
11/12/2025

आभार 🙏🙏🙏
आम्ही वीर प्रतिष्ठान संघटनेने मा श्री सागर ज्ञानदेव माने (लोकनियुक्त सरपंच) याच्याकडे सीसीटीवी कॅमेरा बसविण्याच्या केलेल्या मागणीला यश मिळाले. सरपंच साहेब यांनी केलेल्या निर्धार खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या कामांची प्रशंसा खूपच प्रेरणादायी आहे.आज बोळावी गावामध्ये 4 सार्वजनिक ठिकाणी सामाजिक सुरक्षा च्या दृष्टीने काही नुकसान दायक घटना रोखण्यासाठी व त्यापासून होणारे नुकसान हे टाळता येईल ह्यासाठी बोळावी गावामध्ये 4 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची व्यवस्था केल्याबद्दल मा श्री सागर ज्ञानदेव माने लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत यांचे खूप खूप आभार🙏🙏💐💐

Camera
🚩वीर प्रतिष्ठान संघटना 🚩

ऐतिहासिक विजय! 🇮🇳✨दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास..! २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्य...
03/11/2025

ऐतिहासिक विजय! 🇮🇳✨

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास..!

२०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत, आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाची ही ट्रॉफी आपल्या देशात आणली आहे.

या विजयातून त्यांचा आत्मविश्वास, अथक मेहनत आणि टीमवर्क दिसून येते.

या ऐतिहासिक विजयाबद्दल संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !

Address

AT Post-Bolavi, Tal-Kagal, , Dist-Kolhapur-416218.
Kagal
416218

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वीर प्रतिष्ठान संघटना - Veer Pratishthan Sanghatana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category