Bsp for Nagpur

  • Home
  • Bsp for Nagpur

Bsp for Nagpur Official page for BSP Nagpur. Fighting for Justice, Equality, and Self-Respect for the 85%.

Follow for updates on local issues, rallies, and party news.

⚖️ Social Justice | Equality | Self-Respect
🔵 Jai Bhim!

*बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्यासाठी त्याग, समर्पण आणि संघटन आवश्यक : इंजि. रामजी गौतम*नागपूर : बहुजन समाजान...
11/06/2026

*बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्यासाठी त्याग, समर्पण आणि संघटन आवश्यक : इंजि. रामजी गौतम*

नागपूर : बहुजन समाजाने शासक समाज बनण्यासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारसंपदेचा आधार घेत संघटितपणे कार्य करण्याची गरज असून त्याग, समर्पण आणि समन्वय या मूल्यांचा स्वीकार केल्याशिवाय सामाजिक व राजकीय परिवर्तन शक्य नाही, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक, माजी राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी इंजि. रामजी गौतम यांनी केले.

स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित बहुजन समाज पार्टीच्या प्रदेशस्तरीय कार्यकारिणी बैठकीत, विदर्भस्तरीय संघटन समीक्षा व प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आज बहुजन समाजाकडे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचे विचार व संघर्षाची प्रेरणा असतानाही संघटनात्मक कमतरतेमुळे बहुजन समाजाला आपल्या संविधानिक हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महापुरुषांच्या कार्याचा वारसा संघटितपणे पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांच्या पंजाबमधील सुमारे चार लाख एकर जमिनीचे पुनर्वसन झालेल्या दलितांना वाटप करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही, असे सांगत त्यांनी केंद्रातील विद्यमान सरकारच्या विविध धोरणांवर टीकाही केली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या सेक्टर स्तरावर किमान १०० लोकांचे संघटन उभे करण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात मराठवाडा विभागाचे मनीष कावळे, पश्चिम महाराष्ट्राचे ॲड. संजीव सदाफुले, खानदेशचे राज चव्हाण, मुंबई झोनचे ॲड. धनराज, विदर्भाचे डॉ. मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, विदर्भ विभाग पदवीधर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार संजय थूल, महिला आघाडीच्या डॉ. विद्या राईकवार, नागपूरचे योगीराज लांजेवार, वर्ध्याचे अनोमदर्शी भैसारे, गोंदियाचे सुनील भरणे, भंडाऱ्याचे संजय भिवगडे, गडचिरोलीचे भास्कर मेश्राम, अमरावतीचे राजू गजभिये, अकोल्याचे ॲड. मनीष मस्के, चंद्रपूरचे रत्नाकर साठे, वाशिमचे ॲड. राहुल गवई, बुलढाण्याचे दिलीप सरकटे आणि यवतमाळचे संदेश ढोले यांनी आपल्या विभागातील संघटनात्मक कार्याचा आढावा सादर केला.

यावेळी बसपाचे माजी उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, माजी जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, प्रभारी राजकुमार बोरकर, शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, शहर महासचिव मंगेश नागदेवे, महिला शहर अध्यक्षा डॉक्टर शबाना खान मॅडम आदींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमास प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, मंगेश ठाकरे, प्रदेश सचिव दादाराव उईके, मोहसीन खान, महेंद्र मकेश्वर, विवेक हाडके, प्रफुल्ल माणके, चंद्रकांत देगलूरकर, अशोक गायकवाड, पंडित बोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

– धम्मा दहिवले
प्रदेश मीडिया प्रभारी, महाराष्ट्र राज्य
बहुजन समाज पार्टी

📍 जालना येथे बहुजन समाज पार्टीच्या बूथ/भीमनगर शाखा बोर्डाचे उद्घाटन संपन्नआज दिनांक 09 जून 2026 रोजी जालना येथे बहुजन सम...
09/06/2026

📍 जालना येथे बहुजन समाज पार्टीच्या बूथ/भीमनगर शाखा बोर्डाचे उद्घाटन संपन्न
आज दिनांक 09 जून 2026 रोजी जालना येथे बहुजन समाज पार्टीच्या बूथ व भीमनगर शाखा बोर्डाचे उद्घाटन मा. प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन इन्चार्ज डॉ. मोहन राईकवार साहेब तसेच मा. पंडित दादा बोर्डे (जिल्हा इन्चार्ज, जालना) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी जालना जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बोडले, जिल्हा महासचिव दिलीप हिवाळे, लोकसभा प्रभारी प्रमोद खरात, शाखा अध्यक्ष विकास जाधव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
नवीन शाखा बोर्डाचे उद्घाटन हे संघटन विस्तार, बूथ मजबुतीकरण आणि बहुजन समाजाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
💙 "संगठन मजबूत, बूथ मजबूत – बहुजन समाज पार्टी विजयी!" 💙
📸 कार्यक्रमातील काही क्षण...
#जयभीम #बसपा

बहुजन समाज पार्टी नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन समाज पार्टीची अर्जंट बैठक यशस्वीरीत्या...
08/06/2026

बहुजन समाज पार्टी नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन समाज पार्टीची अर्जंट बैठक यशस्वीरीत्या संपन्न

नागपूर : दिनांक 11 जून 2026 रोजी प्रदेश प्रभारी व खासदार मा. रामजी गौतम साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष मा. ॲड. सुनील डोंगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव देशपांडे हॉल, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित विदर्भ-मराठवाडा संघटन समीक्षा बैठक व कार्यकर्ता संमेलनाच्या तयारीसंदर्भात बहुजन समाज पार्टीच्या नागपूर शहर कार्यालय, रामेश्वरी रोड येथे नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेखाली अर्जंट बैठक आयोजित करण्यात आली.

ही बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली असून आगामी कार्यक्रमाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम भव्य व यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच संघटन बळकटीकरण, जनसंपर्क वाढविणे आणि अधिकाधिक कार्यकर्त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सौरभ जामगडे, पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष मनोज निकाळजे, पूर्व नागपूर विधानसभा निरीक्षक शुभम गरडे, मध्य नागपूर विधानसभा अध्यक्ष विलास पाटील, नागपूर शहर महासचिव मंगेश नागदिवे तसेच दक्षिण, उत्तर, मध्य आणि इतर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत आगामी कार्यक्रमासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर शहर कार्यालय येथे पार पडलेली ही बैठक अत्यंत सकारात्मक व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

🚩 बहुजन समाज पार्टी – विदर्भ विभागीय समीक्षा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर 🚩बहुजन चळवळीच्या विचारांना अधिक बळकट करण्यासा...
08/06/2026

🚩 बहुजन समाज पार्टी – विदर्भ विभागीय समीक्षा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर 🚩
बहुजन चळवळीच्या विचारांना अधिक बळकट करण्यासाठी, संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय व सामाजिक दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या "विदर्भ विभागीय समीक्षा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास" सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सेक्टर प्रभारी, बूथ कार्यकर्ते व बहुजन हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
✨ प्रमुख मार्गदर्शक:
मा. खासदार इंजि. रामजी गौतम साहेब
(केंद्रीय कोऑर्डिनेटर व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, बसपा)
✨ अध्यक्षता:
एड. सुनील डोंगरे साहेब
(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, बसपा)
📅 दिनांक: ११ जून २०२६ (गुरुवार)
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवाससमोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर
🔷 संघटन समीक्षा
🔷 आगामी कार्यक्रमांचे नियोजन
🔷 कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
🔷 बहुजन चळवळीच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण दिशा
⚠️ विशेष सूचना:
हा कार्यक्रम प्रत्येक बसपा पदाधिकारी, कार्यकर्ता व बहुजन समाजाच्या हितचिंतकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेवर व अनिवार्यपणे उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा. आपल्या एका उपस्थितीमुळे संघटन अधिक मजबूत होईल.
📢 आजच आपल्या विभागातील सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि उपस्थिती निश्चित करा!
🐘 जय भीम! जय भारत!! जय बसपा!!! 🐘

📢 अखेर बहुजन समाजाच्या संघर्षाला यश! महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची (MNLU) पीएच.डी. राखीव जागांसाठी अधिसूचना जार...
08/06/2026

📢 अखेर बहुजन समाजाच्या संघर्षाला यश! महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची (MNLU) पीएच.डी. राखीव जागांसाठी अधिसूचना जारी! 🎓✨
बसपाच्या (BSP) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (MNLU), नागपूर येथे आरक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने राखीव प्रवर्गातील अनेक जागा रिक्त होत्या. या अन्यायाविरुद्ध बसपाच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बिजेंद्र सिंह यांची भेट घेऊन १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

अधिसूचनेतील महत्त्वाचे मुद्दे:

१९ रिक्त जागांवर आता राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC व इतर) पात्र उमेदवारांना पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाणार आहे.
या निर्णयामुळे मागासवर्गीय संशोधक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण असून, बसपाच्या या आंदोलनामुळे आरक्षणाच्या हक्काची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यात नागपूर लोकसभा प्रभारी डॉ. शितल नाईक, निवृत्त आयआरएस अधिकारी संजय थुल, आणि शहर सरचिटणीस मंगेश नागदावे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हा लढा असाच पुढेही सुरू राहील! ✊⚖️

*बहुजन समाज पार्टी:*                         *अर्जेंट मीटिंग*संपन्न हुई 🐘नागपुर जिल्हा पदाधिकारी , शहर पदाधिकारी और विधा...
07/06/2026

*बहुजन समाज पार्टी:*
*अर्जेंट मीटिंग*संपन्न हुई
🐘नागपुर जिल्हा पदाधिकारी , शहर पदाधिकारी और विधानसभा के अध्यक्ष एवं प्रभारी इनकी अर्जेंट मीटिंग रविवार दिनांक ०७/०६/२०२६ को सुबह ११:०० बजे बहुजन भवन विदर्भ विभागीय कार्यालय नागपुर में आयोजित की गई थी जिसमें प्रदेश, जिल्हा, शहर, के प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे ।

*विषय:-* दिनांक *११/०६/२०२६* को नियोजित प्रदेश प्रभारी एवं *खासदार मा.रामजी गौतम साहब* इनके मुख्य मार्गदर्शन में एवं *प्रदेश अध्यक्ष मा.एडवोकेट सुनील डोंगरे साहब* इनकी अध्यक्षता में आयोजित विदर्भ मराठवाड़ा की संगठन समीक्षा मीटिंग और कार्यकर्ता सम्मेलन जो वसंतराव देशपांडे हॉल सिविल लाइन नागपुर में आयोजित किया गया है । उस कार्यक्रम की तैयारी के संबंध मे नागपुर जिल्हा, शहर, विधानसभा के पदाधिकारियों की अर्जंट बैठक *जिल्हाध्यक्ष मा.योगेश लांजेवार इनकी अध्यक्षता* में आयोजित की गई थी । 🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
प्रमुख उपस्थित:- प्रदेश सचिव : मा.विवेक हाड़के,प्रदेश मीडिया प्रभारी:मा.धम्मा दहीवले, कानूनी सलाहकार एडवोकेट संजय पाटिल,रामटेक लोकसभा : इंचार्ज मा.भाऊसाहेब किशोर गेड़ाम , व मा.राजकुमार बोरकर , जिल्हा उपाध्यक्ष: मो.फिरोज ख़ान (राजा भाई ),शहर अध्यक्ष: मा.अनिकेत कुत्तरमारे,शहर महिला अध्यक्ष डॉ.शबाना ख़ान मैडम, शहर महासचिव मंगेश नागदेवे,डॉ.शीतल नाइक,अजय उके ,शहर सचिव: मा.सुमित चव्हाण,वाहतुक शहर अध्यक्ष: मो.आदिल खान,सीख समाज से सतपाल सिंग वीरदी एवं विधानसभा अध्यक्ष, प्रभारी आदि उपस्थित थे । पूज्य भंते संघ रत्न एवं भंते बोधिचित्त प्रमुखता से उपस्थित थे ।

इस अवसर पर बामसेफ कन्वेनर मा.संजय थुल साहब इनका आभार व्यक्त किया गया । साथ ही शहर उपाध्यक्ष मा.महेश माने इन्होंने अल्पोपहार की व्यवस्था की उनका आभार व्यक्त किया गया ।
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘

बहुजन समाज पार्टीची ‘33 कोटी वृक्ष लागवड’ मोहिमेची चौकशी करण्याची मागणीनागपूर : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘33 को...
05/06/2026

बहुजन समाज पार्टीची ‘33 कोटी वृक्ष लागवड’ मोहिमेची चौकशी करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘33 कोटी वृक्ष लागवड’ मोहिमेअंतर्गत प्रत्यक्षात किती झाडे लावण्यात आली, त्यापैकी किती झाडे आजही जिवंत आहेत व या मोहिमेवर किती निधी खर्च करण्यात आला याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

बहुजन समाज पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार, शहर अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यभर 33 कोटी झाडे लावल्याचा दावा करण्यात आला असला तरी अनेक भागांमध्ये प्रत्यक्षात झाडे दिसून येत नसल्याने या मोहिमेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

निवेदनाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात किती झाडे लावली, त्यापैकी किती जिवंत आहेत याचा अहवाल जाहीर करावा, प्रत्येक लागवड स्थळाचे GPS लोकेशन व छायाचित्रे सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध करावीत, तसेच झाडांच्या देखभाल व संवर्धनासाठी खर्च झालेल्या निधीची माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी CBI किंवा न्यायालयीन समितीकडून करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश मीडिया प्रभारी धम्मदीप दहिवले, नागपूर शहर महासचिव मंगेश नागदिवे, दक्षिण-दक्षिण विधानसभा अध्यक्ष सौरभ जामगडे, लोकसभा निरीक्षक डॉ. नाईक सर, नागपूर शहर सचिव अमित बोरकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष परिणामकारक वृक्ष लागवड व संवर्धनाची अंमलबजावणी व्हावी आणि जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी शासनाने तात्काळ माहिती सार्वजनिक करून चौकशी करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.

Bsp for Nagpur
Bsp for Maharashtra

🚨 नागपूर गुन्हेगारीमुक्त करा! 🚨नागपूर शहरात वाढती गँगवार, खून, खंडणीखोरी, अमली पदार्थांची विक्री आणि संघटित गुन्हेगारी य...
04/06/2026

🚨 नागपूर गुन्हेगारीमुक्त करा! 🚨
नागपूर शहरात वाढती गँगवार, खून, खंडणीखोरी, अमली पदार्थांची विक्री आणि संघटित गुन्हेगारी याविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
🔹 वाढत्या गुन्हेगारीची उच्चस्तरीय चौकशी करा
🔹 अपयशी पोलीस प्रशासनावर कारवाई करा
🔹 नवीन कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त नियुक्त करा
🔹 अवैध हुक्का पार्लर, गांजा व अवैध दारू धंदे बंद करा
जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि नागपूरच्या भविष्यासाठी BSP रस्त्यावर उतरली आहे.
"गुन्हेगारांना संरक्षण नाही, जनतेला सुरक्षा हवी!"

GMCH स्वायत्तता प्रस्तावाविरोधात बसपाचे निवेदननागपूर, दि. १ जून : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपूर य...
03/06/2026

GMCH स्वायत्तता प्रस्तावाविरोधात बसपाचे निवेदन
नागपूर, दि. १ जून : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपूर यास स्वायत्तता (Autonomy) देण्याच्या प्रस्तावाविरोधात बहुजन समाज पार्टी, नागपूर शहरच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले. या प्रस्तावामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या हिताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता बसपाने व्यक्त केली आहे.
बहुजन समाज पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष अनिकेत कुतरमारे यांच्या नेतृत्वात हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, DMER संचालक तसेच GMCH प्रशासनाकडे सादर करण्यात आले. निवेदनात आरक्षण व्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम, शिक्षण शुल्क व रुग्णालयीन सेवांमध्ये होणारी शुल्कवाढ, कंत्राटीकरणाचा वाढता धोका, तसेच गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
बसपाने आपल्या निवेदनात नमूद केले की, GMCH हे विदर्भातील लाखो गरीब व सर्वसामान्य रुग्णांचे आधारकेंद्र असून स्वायत्ततेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच निर्णय प्रक्रियेत SC, ST, OBC आणि EWS घटकांच्या प्रतिनिधित्वाची हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी वरिष्ठ पदाधिकारी तथा निवृत्त आयआरएस अधिकारी संजय थुल, जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, प्रदेश मीडिया प्रभारी धम्मदीप दहिवले, नागपूर शहर महासचिव मंगेश नागदिवे, लोकसभा निरीक्षक डॉ. नाईक सर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बसपाने शासनाला इशारा देत म्हटले आहे की, सामाजिक न्याय, संविधानिक आरक्षण आणि सर्वसामान्य रुग्णांच्या हिताचा विचार न करता GMCH ला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेतल्यास बहुजन समाज पार्टी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल.

– प्रसिद्धीपत्रक
अनिकेत कुतरमारे
अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी
नागपूर शहर.

अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात तस...
25/05/2026

अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात तसेच खुल्या प्रवर्गात ओबीसी, एसटी व एससी समाजातील गुणवंतांना प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने संविधान चौक येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व बसपा नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केले. यावेळी प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, शहर महासचिव मंगेश नागदेवे, विद्यार्थी नेते सौरभ जामगडे, शितल नाईक, राजकुमार बोरकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकारी अनुप खंडे यांची भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. “अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द करा”, “आरक्षण बचाव – संविधान बचाव” अशा घोषणांनी संविधान चौक दणाणून गेला. यावेळी बसपा कार्यकर्त्यांनी शासनाच्या संविधानविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला.

Address


431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bsp for Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share