Vijay Bhimrao Nikam

Vijay Bhimrao Nikam राज्य संघटक- समता सैनिक दल ,महाराष्ट्र तथा प्रचारक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व तत्वांचा

16/03/2026

समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोटारसायकल रॅलीत मार्गदर्शन करताना..

16/03/2026
22/01/2026

*समता सैनिक दल*
(संस्थापक - विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर)
-----------------------------------------
*समता सैनिक दल जळगाव जिल्हा स्तरीय बैठकीचे जाहीर निमंत्रण*

*मार्गदर्शक - मा. धर्मभूषण बागुल साहेब*
राज्याध्यक्ष, समता सैनिक दल

मित्रांनो,
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संघटना पुनश्च उभारण्याचे कार्य आपण हाती घेतले आहे. या संघटना बाबासाहेबांनी स्थापन केल्या आहेत म्हणून त्यांचे अनन्य साधारण महत्व आहेच.परंतु या संघटनांचे ध्येय आणि तत्वज्ञान देखील महान असून भारतातील सर्व सामान्य लोकांसाठीच नव्हे तर एकूणच मानवी जीवनात सकारात्मक आणि विधायक बदल घडवून आणण्यासाठी आजही अतिशय आवश्यक आहेत.
*परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, कोणतेही तत्वज्ञान निर्माण केल्यानंतर त्याचा जनतेत प्रचार करून प्रस्थापित करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी संघटना उभारणे आवश्यक असते.*
*राष्ट्रनायक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या हितासाठी , देशातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी 7 महान तत्वे निर्माण केली आहे. या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी समता सैनिक दल ही सामाजिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही राजकीय संघटना स्थापन केल्या होत्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर या संघटना नेस्तनाबूत झाल्या.आज ही या संघटनांची, त्यांच्या तत्वांची देशाला गरज आहे. म्हणून पहिल्या टप्प्यावर समता सैनिक दल उभारणे ही काळाची गरज आहे.या कार्यास आम्ही सुरुवात केली आहे.परंतु आम्हास आंबेडकरी विचारांच्या प्रामाणिक ,निष्ठावान सहकाऱ्यांची गरज आहे. अशा सहकाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.*
कोणतीही संघटना स्थापन करून तिला उभे करणे खूप कठीण काम असते. एकेकाळी प्रस्थापित असलेली संघटना नेस्तनाबूत झालेली असेल तर त्यास ऊर्जितावस्थेत आणणे त्यापेक्षा जास्त कठीण काम असते.याची जाणीव आम्हास आहे आणि पदोपदी होत आहे.
तरीही न डगमगता आम्ही मार्गक्रमण करण्याचा निश्चय केला आहे.वाटेत कितीही अडचणी आल्या , संकटे आली , समस्या निर्माण झाल्या तरी परिस्थितीशी संघर्ष करून त्यातून पुढे चालत राहणे गरजेचे आहे.आपणास तेच करावे लागणार आहे....
*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले समता सैनिक दल ही संघटना सर्व भारतीयांसाठी खुली आहे.जात - धर्म - लिंग - वंश यावरून कोणताही भेदभाव या संघटनेत केला जाणार नाही. जातीभेद , धर्म भेद ,अनिष्ट प्रथा ,परंपरा , समजुती यामुळे निर्माण झालेली सामाजिक ,आर्थिक , राजकीय , धार्मिक , सांस्कृतिक , बौद्धिक अशी दूरवर परसरलेली सर्वांगीण विषमता नष्ट करून स्वातंत्र्य,समता ,बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित असलेली जीवन पध्दती आणि शासन व्यवस्था निर्माण करण्याचे महान कार्य समता सैनिक दलाच्या माध्यमातून करायचे आहे.हेच समता सैनिक दलाचे म्हणजेच आंबेडकरी विचारांचे व आंबेडकरी संघटनांचे कार्य आहे.हेच समता सैनिक दलाचे ध्येय आहे.*
यासाठी प्रामाणिक , ध्येयवादी , निष्ठावान , अभ्यासु , निस्वार्थी कार्यकर्त्यांची गरज आहे.
*निव्वळ पदे घ्यायची , जबाबदारी स्वीकारायची , पुढारपण करीत फिरायचे , मोठमोठे स्वप्न बघायचे आणि प्रत्यक्ष कृती काहीच करायची नाही अशा विपरीत परिस्थितीत आंबेडकरी चळवळ अडकली आहे.* इतर अनेक कारणे आहेत की ज्यांच्या मुळे भारतात आंबेडकरी चळवळ पूर्ण ताकदीने उभी राहू शकली नाही.किंवा उभी असलेली चळवळ हळूहळू नेस्तनाबूत झाली आहे.....होत....आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही समता सैनिक दल या महान संघटनेचे कार्य हाती घेतले आहे.परंतु मागील अनुभव लक्षात घेता आता वेळ वाया न घालविता व चुकांची पुनरावृत्ती न करता योग्य पद्धतीने आणि शिस्त व नियम पाळून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.याचसाठी जळगाव जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या जळगाव जिल्हास्तरीय पातळीवर समता सैनिक दलाचे कार्य करणारी आणि करण्याची इच्छा असणाऱ्या प्रामाणिक लोकांची फळी निर्माण म्हणजेच जळगाव पूर्व पश्चिम जिल्हा कार्यकारणी तयार करायची आहे.
या या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीत सामील होणारा प्रत्येक व्यक्ती , प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी महत्वाचा आहे.
यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व जळगाव शहरातील आंबेडकरी विचारांच्या बांधवांना या बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे. तसेच जाहीरपणे खुले निमंत्रण देत आहोत.
*आपण देखील किमान एका तालुक्यात किंवा जिल्ह्यात समता सैनिक दल उभे करण्याची जबाबदारी घेण्यास तयार असाल तर खालील मो.न.वर किंवा व्हॉट्सॲप वर आम्हाला संपर्क करावा.ही विनंती.*
लक्षात असू द्या , समता सैनिक दलाचे लाखो नव्हे करोडो समर्थक भविष्यात तयार होणार आहेत....पण त्यासाठी कुशल संघटन कौशल्य असलेले , मेहनत घेणारे , नेतृत्व गुण अंगी असलेले , जबाबदारी घेणारे लोकांची खूप आवश्यकता आहे.
*आपण किमान एका तालुक्यात दलाचे कार्य करू शकत असाल , किमान 50 ते 100 सैनिकांची टीम तयार करू शकत असाल , सदस्य बनवू शकत असाल तर या सभेस अवश्य उपस्थित राहिले पाहिजे.*
*या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीत जळगाव पूर्व पश्चिम जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात*
आम्ही तुमच्या संपर्काची वाट बघत आहोत.
जय भीम ....जय भारत....!!!
*बैठकीचे ठिकाण- पद्मालय विश्रामगृह जळगाव*
*दिनांक 5 फेब्रुवारी 2026 वेळ दुपारी एक वाजता*

निमंत्रक
विजय निकम -राज्य संघटक
किशोर डोंगरे -जिल्हाध्यक्ष
*संपर्क 9921323281, 7020558011*
*7249024141,9503152470*

30/12/2025

समता सैनिक दल सज्ज आहे संविधान ओळख सेवा असण्यासाठी तुम्ही येणार का आमच्या सोबत...!

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Bhimrao Nikam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share