Office of Adv Dhairyashil Patil

Office of Adv Dhairyashil Patil Page managed by the Office of Adv. Dhairyashil Patil.

वाळवा तालुका आणि परिसरातील विविध शाळा महाविद्यालयांमधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसा...
12/06/2026

वाळवा तालुका आणि परिसरातील विविध शाळा महाविद्यालयांमधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय; खा. एस.डी.पाटील आर्किटेक्चर हॉलमध्ये शुक्रवार दिनांक 12 जून रोजी *पुढारी कॅम्पस टू करिअर* हा मोठा उपक्रम झाला. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी झालेल्या सेमिनारमध्ये पुणे येथील विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. सीईटी, कॅप राऊंड, ऍडमिशन प्रक्रिया, करिअरसाठी टॉपचे कोर्सेस; अशा सर्व विषयाच्या अनुषंगाने दैनिक पुढारीच्या वतीने हा सेमिनार झाला.या कार्यक्रमाच्या प्रारंभी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांनी आपल्या स्वागत पर मनोगतामध्ये करिअरच्या विविध संधी बरोबरच दैनिक पुढारीने आयोजित केलेल्या या कॅम्पस टू करिअर उपक्रमाची गरज विशद करून प्रशंसा केली. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि करिअरच्या दिशा मिळाल्या तर विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडू शकते; असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

JEE Advance परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून देशातील अग्रमानांकित IIT मध्ये प्रवेश प्राप्त ठरलेला विद्यामंदिर सायन्स कॉ...
02/06/2026

JEE Advance परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून देशातील अग्रमानांकित IIT मध्ये प्रवेश प्राप्त ठरलेला विद्यामंदिर सायन्स कॉलेज च्या IIT NEET ( VIN ) अकॅडमी चा विद्यार्थी कु विनीत नांगरे याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
खासदार एस डी पाटील विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या VIN ACADEMY च्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे JEE MAINS आणि JEE ADVANCE परीक्षेमध्ये आपल्या उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यामंदिर मधून IIT ला प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यामंदिर हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर करियर साठी संधी देणारे महाविद्यालय ठरले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ रजनीश कामत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अ...
22/05/2026

शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ रजनीश कामत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळातील त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठ देशातील शैक्षणिक केंद्रात अग्रस्थानी राहील.
याप्रसंगी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा चिमणभाऊ डांगे तसेच कागल एज्युकेशन सोसाइटी चे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा प्रताप उर्फ भैय्या माने उपस्थित होते.

education

एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ईश्वरपूर च्या उप प्राचार्य (प्रशासन) कक्षाचे उद्घाटन मा विजय पाटील (भाऊ) कार्यकारी स...
15/05/2026

एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ईश्वरपूर च्या उप प्राचार्य (प्रशासन) कक्षाचे उद्घाटन मा विजय पाटील (भाऊ) कार्यकारी समिती सदस्य फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या शुभहस्ते व वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संचलित वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशन, ईश्वरपूरता. वाळवा, जि. सांगल...
13/04/2026

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संचलित वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच
वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशन, ईश्वरपूर
ता. वाळवा, जि. सांगली
वार्षिक पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ
शैक्षणिक वर्ष : 2025-2026
प्रमुख पाहुणे: अॅड धैर्याशिल पाटील (बाबा)
( सहसचिव, वा. ता.एज्यु.सोसा.ई.पूर )

मिरज येथे लोकनेते शरद पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभास उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थ्यांच अभिनंदन केले. म...
08/04/2026

मिरज येथे लोकनेते शरद पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभास उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थ्यांच अभिनंदन केले. मिरज महाविद्यालय हे मिरज पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी बहुआयामी शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. कै आमदार शरद पाटील यांच्या योगदानातून यशवंत शिक्षण संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. सर्व संचालक, प्राचार्य व प्राध्यापक सहकाऱ्यांचेदेखील अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी यशवंत शिक्षण संस्थेच अध्यक्ष राजगौडा पाटील, सचिव एस आर पाटील. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच सदस्य प्राचार्य व्ही एम पाटील, महाविद्यालयाच प्राचार्य गायकवाड उपस्थित होते

• झेप 2026 ••••
07/04/2026

• झेप 2026




Address

Islampur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Adv Dhairyashil Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category