13/02/2014
चला उद्याचा सामर्थ्यवान हिंदुस्थान घडवूया ! सुरवात महाराष्ट्रापासून
करूया...!!
१९५७ साली पहिले स्वतंत्रयुद्ध झाले. त्याला आज १६५ वर्ष
पूर्ण झाली. १५ ऑगस्ट १९४७ साली हिंदुस्थान
स्वतंत्र झाला. ज्ञात-अज्ञात स्वतंत्र
सैनिकांच्या बलिदानाला स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला.
एका पिढीकडून या स्वातंत्र्याचा वारसा आज ६५ वर्षानंतर
दुसर्या पिढीकडे पोहचला.
उद्या तो तिसर्या पिढीकडे जाणार पण त्या ज्ञात-अज्ञात
स्वतंत्र सैनिकांचे स्वराज्याचे स्वप्न आज कशा स्थितीत आहे
तर ... भ्रष्टाचाराने, विषमतेने आक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे.
स्वातंत्र्याचा लाभ संपूर्ण जनतेपर्यंत पोहचलेला नाही. स्वतंत्र
मिळाले, पण कुणाला ? हा प्रश्न भेडसावतो आहे
अशी परिस्थिती. इंग्रज या देशातून
हटवला गेला पण आज स्वकीयांनीच
देशाची लुट चालवली आहे. गुंडगिरी,
दहशदवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विद्वेष
यांच्या विळख्यात समाज आणि देश सापडला आहे. जनता अधिकाधिक
ग्रासली जात आहे. लुटणारे, अन्याय करणारे गोरे गेले आणि काळे
आले. फरक एवढाच झाला. स्वतंत्र लढ्यातील बलिदानाला,
त्यागाला, देशभक्तीला असे फळ यावे
यासाठी का हजारो हुतात्म्यांनी बलिदान केले ?
आपण निमुटपणे हे सारे बघत बसायचे ? स्वतंत्र मुठभर लोकांपुरतेच मर्यादित
होऊ द्यायचे ? नाही..! असे करून चालणार
नाही...!! ही स्थिती जर
देशाची आहे तर
महाराष्ट्राचीही परिथिती काही वेगळी नाही.
१०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले
आणि लक्षावधी कष्टकर्यांच्या घामाने संपन्नतेकडे जाणारे आपले
महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले.
मराठी माणसाला व मराठी भाषेला धन्य धन्य वाटले.
५३ वर्ष उलटली महाराष्ट्र राज्याच्या अस्तित्वाला.. पण
आजही खेड्यापाड्यात,
वाडीवस्तीवर पिण्याचे
पाणी नाही. रस्ते, वीज,
रोजगाराच्या संधी नाहीत कि विस्थापितांना मुलभूत
हक्क नाहीत. आधीच महागाईने-बेरोजगाराने सर्व
सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्यातच जोडीला दहशदवाद
व भांडवलशाही जनसामन्यांस भरडते आहे. सामान्य माणसाचे
जीवन अगदी बिकट झाले आहे. गाव
असो किंवा शहर परिस्थिती खालावत चालली आहे.
राज्यात किमान २ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.
वीज टंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने गेल्या ६० वर्षाचा उच्चांक
गाठला आहे. या सर्व समस्यांनी संपन्न
महाराष्ट्राची दुराव्यस्था झाली आहे व
ती आणखीनच
व्हावी यासाठी काही राजकीय
पक्ष प्रयत्न करत आहे हीच आहे
का लोकशाही ?
वास्तविक पाहता लोकांनी लोकांसाठी लोक सहभागातून
चालवलेली राज्य पद्धती म्हणजे
लोकशाही. याचाच अर्थ राज्य जनतेचे आहे.
जनता सत्ताधीश आहे.
लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी तिचे
सेवक आहेत. कारण २६ जानेवारी १९५०
रोजी देश प्रजासत्ताक झाला म्हणजे
जनता या देशाची मालक झालेली आहे. परंतु आचे
प्रस्थापित राजकारणी मात्र
लोकशाहीची 'लेकशाही' म्हणजेच
घराणेशाही बनवत आहे व खरी सामान्य
जनता मात्र हतबल झाली आहे. हे चित्र
बदलण्याची एकाही राजकीय
पक्षाची इच्छाशक्ती नाही.
यासाठीच तुमच्याआमच्यासारख्याच सर्वसामान्य माणसांतून एक
असामान्य व्यक्तिमत्व पुढे येत आहे ते म्हणजे ... श्री.
उदयनाथजी महाराज.
महाराजांच्या तेजस्वी विचारांनी प्रभावित होऊन
"प्रजेतुनच प्रजेचा राज्यकर्ता" घडविण्यासाठी हिंदुस्थान
प्रजा पक्षाची स्थापना दि. १९ नोव्हेंबर २००८
रोजी झाली आहे. कार्यकर्ता हाच नेता, तोच
उद्याचा राज्यकर्ता या विचाराने कार्य सुरु केले आहे. आज
मितीला संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे साडेपाच लाख सदस्य
आहेत.
सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांना दूर सारून विस्थापितांना हक्क
देण्यासाठीच राजकारण हीच हिंदुस्थान
प्रजा पक्षाची प्रमुख भूमिका आहे. भ्रष्टाचार,
बेरोजगारी, आर्थिक विषमता, महागाईचे निर्मुलन करणे हाच
उद्देश आहे. सर्व समाजाला संविधानाप्रमाणे समान संधी, समान
प्रतिष्ठा न्याय व सत्तेतील सहभाग देणे हाच
पक्षाचा कार्यक्रम आहे. विस्थापित, कष्टकरी, वंचित,
उपेक्षित, शोषित
अशा सर्वसामन्यांशी पक्षाची बांधिलकी आहे.
त्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी सामुहिक कृतीतून
संविधानिक मार्गाने जनतेला (वंचितांना) हवा असणारा समर्थ
राजकीय पर्याय उभा करण्याचा हिंदुस्थान प्रजा पक्षाचा प्रयत्न
आहे. भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद अथवा धर्मवाद
विरहीत प्रगत आणि सामर्थ्यवान हिंदुस्थान घडविणे हेच
आमचे ध्येय आहे. यात आपली साथ व सक्रिय सहभाग
अपेक्षित आहे.
चला तर मग पुन्हा एकत्र येऊया व स्वराज्याचे सुराज्य घडवूया..!