मुक्तिपथ

मुक्तिपथ Mukipath is a joint initiative of Government of Maharashtra, Tata Trusts and SEARCH to reduce the pr

जगभरातील मृत्यूच्या आणि रोगांच्या प्रमुख तीन कारणांत तंबाखू आणि दारू हयांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यव्यापी गुटखा व सुगंधित तंबाखूबंदी केली असूनही जिल्ह्यामधे तंबाखूचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. गडचिरोली जिल्ह्यातील लोकांत तंबाखू वापराचे सरासरी प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असून तंबाखूवर खर्चही फार मोठ्या प्रमाणावर होतो. ‘सर्च’ ने 2008-09 साली केलेल्या एका अभ्यासानुसार या वर्षात ग

डचिरोलीतील लोकांनी तंबाखूवर 73 कोटी रुपये खर्च केले.
दारू ही देखील आरोग्याला आणि विकासाला मारक ठरते. गडचिरोली जिल्हेयातील जनतेने केलेल्या आंदोलनानंतर गडचिरोलीत 1993 पासून दारूबंदी झाली पण दारूबंदीची अंमलबजावणी अपुरी राहीली. दारूची दुकाने आणि पिण्याचे परवाने रद्द केल्यानंतर अन्य कोणतीच शासकीय कृती न केल्याने अवैध दारूचे प्रमाण बरेच फोफावले.
गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू विकत घेण्यावर लोकांचा प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च होतो. त्यामुळे होणारे दुष्परिणाम – रोग, मृत्यू, उत्पादक शक्ती ची हानी, स्त्रियांवर अत्याचार व अपघात – प्रचंड असणे तर्कसिद्ध आहे. म्हणून गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व दारुचा वापर वेगाने कमी करणे हे आरोग्य रक्षण व आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरते.
महाराष्ट्र शासन , टाटा ट्रस्ट व सर्च यांच्या संयुक्त पुढाकाराने दारु-तंबाखुचा वापर कमी करण्यासाठी, गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’ हा बहु आयामी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सप्टेबर 2016 पासुन या प्रकल्पाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सुरु झाली आहे.

27/02/2026
13/02/2026

When youth unite, movements are born.🌱

With courage in their hearts and non-violent action in their hands, youth are standing up against alcohol, not with anger, but with awareness.

This is more than a campaign.
It’s a commitment to healthier families, stronger villages, and a brighter future.

One action. One voice. One generation choosing change.

MUKTIPATH

31/12/2025

नववर्षाच्या निमित्ताने तरुणांनी दिला मनातून आलेला व्यसनमुक्तीचा संदेश 🤍
स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि उज्वल उद्यासाठी,
आज घेतलेला हा संकल्प, उद्याचे आयुष्य बदलू शकतो. 🌱✨

'मुक्तिपथ'देत आहे, प्रत्येक शाळात व्यसनमुक्तीचा संदेश.
12/12/2025

'मुक्तिपथ'देत आहे, प्रत्येक शाळात व्यसनमुक्तीचा संदेश.

22/11/2025

दारूमुळे संसार उद्धवस्थ होतात, त्यामुळे दारू नकोच, ही प्रतिक्रिया आहे चमोर्शी तालुक्यातील जोगणा गावच्या सरपंच सागर मेश्राम यांची. या गावात गेली चार वर्षे दारूविक्री बंद आहे. मुक्तिपथ, गावसंघटना, पोलिस आणि विशेष करून गावाच्या महिलांनी गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. दारूविक्री बंद झाल्याने महिलांना फायदा झाल्याचे मेश्राम सांगतात.
गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’च्या माध्यमातून दारू आणि तंबाखूच्या व्यसनांविरोधात व्यापक कार्यक्रम सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील १५०० पैकी ७१० गावांत दारूविक्री बंद आहे. ग्रामस्थांनी या गावांचा आदर्श घेत आपल्या गावातील दारूविक्री बंद करावी असे आवाहन मुक्तिपथ करत आहे.

No ToAlcohol ToDrugsAndAlcohol #मुक्तिपथ

06/11/2025

08/10/2025

***co

Muktipath, Dist Gadchiroli
17/08/2025

Muktipath, Dist Gadchiroli

दारूला नाही म्हणा......
08/08/2025

दारूला नाही म्हणा......

Address

Gadchiroli
Gadchiroli
442603

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुक्तिपथ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मुक्तिपथ:

Share