27/02/2026
बुलढाणा, अकोला आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये युवा उद्योजक म्हणून कार्यरत राहून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदान दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा सचिव गणेश जाधव यांना प्रतिष्ठित “लोकमत गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करताना महात्मा फुले शाळेचे माजी मुख्याध्यापक रमाकांत कमळकर सर, राजे जाधव सर, प्रतीक बिलारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा गौरवाचा क्षण अधिक आनंददायी व प्रेरणादायी ठरला.