05/07/2024
प्रति,
जिल्हाधिकारी / जिल्हा आरोग्य अधिकारी.
जिल्हा परिषद
बुलढाणा.
मार्फत - तालुका वैद्यकीय अधिकारी, संग्रामपूर.
विषय - आदिवासी भागातील व जिल्ह्यातील आरोग्य सेवा दुरावस्था व रिक्त पदे भरण्याबाबत..
माननीय महोदय ,
आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, जिल्हाभरात आरोग्य सेवेत अनेक पदे रिक्त आहेत आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक साथीचे आजार ग्रामीण भागात व विशेषतः आदिवासी भागात पसरले आहेत आणि त्यामुळे जिल्हाभरात व विशेषतः आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत ,औषध वितरक नाही आणि याचा परिणाम जनतेला आरोग्य सुविधा मिळत नाही. विशेष करून आदिवासी असलेल्या संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात अनेक पदे रिक्त आहेत. तर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र ही बंद आहेत .त्यामुळे आदिवासी जनतेला आरोग्यसेवा मिळत नाही .आम्ही आपणास इशारा देत आहोत की , लवकरात लवकर जिल्हाभरातील व विशेष करून आदिवासी भागातील आरोग्य सेवेतील रिक्त पदे तात्काळ भरावीत व नागरिकांना आरोग्य सेवा बहाल करावी. अन्यथा आमच्या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील ही बाब लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी..
निवेदन आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मा. वैधकीय अधिकारी साहेब संग्रामपूर, मा. ठाणेदार साहेब पोलिस स्टेशन संग्रामपूर, मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय संग्रामपूर यांना देण्यात आले त्यावेळी उपस्थित रविंद्र झाडोकार शिवसेना तालुका प्रमुख संग्रामपूर, राहुल मेतांगे शिवसेना तालुका संघटक, अजय घिवे विधान सभा संघटक युवासेना, प्रशांत इंगळे युवा सेना तालुकाप्रमुख संग्रामपूर, शाखा प्रमुख गुणवंत पाटील, ऋतिक ठाकरे उप तालुका प्रमुख युवासेना, आदी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते..