Food For Needy, Help For Needy, Education For Needy

Food For Needy, Help For Needy, Education For Needy भुक
Food For Needy
More than 150 people getting benefits of free food. We are serving Food Fo

17/03/2026
दिवस बाळपणाचे
05/02/2026

दिवस बाळपणाचे

*श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्रएका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे*. *अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला...
04/12/2025

*श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र
एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे*.

*अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवींनी आपले नवरे पाठवले, तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तीनही देवांना बाळं करून इच्छाभोजन दिले. त्यामुळे अनसूयेचे सत्त्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्त्व लाभले. मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि आमचे पती आम्हाला परत कर म्हणाल्या. तेव्हा घेऊन जा तुम्ही तुमचा पती, हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण*!

*असूया शून्य अनसूया, अशी सत्त्वशील अनसूयेचे देहबोली. ऋषीपत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनुसूयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजवून झाल्यानंतरचा मातृत्त्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बाल रुपात आल्यावर निश्चिन्तपणे झोपी गेलेत. आई जवळ असताना कसली काळजी! बरीच वर्षं वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते, ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनसूयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे. आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या फजितीने खजील होऊन आपला नवरा कोणता हे ओळखण्यात मग्न आहेत*.

*पाठमोरी उभी असलेली भरजरीत वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज, सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतेय. एवढे सगळे सुख असूनही अनसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत*.

*तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले. त्रिदेवांना अनसूयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघींचा गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून, वेषांतर करून 'आई, इच्छाभोजन दे, पण विवस्त्र होऊन!' अशी मागणी केली. 'आई' अशी हाक ऐकल्याने अनसूयेला वात्सल्याचा पान्हा फुटला. तिघांना बालरूप केले. भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले*.

*बाळं सगळीच गोड, गोंडस आणि* *एकसारखी. आपला पती नक्की कोणता, हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनसूया मातेने तीनही देवांना पूर्ववत केले. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सपत्नीक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्याच दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्त गुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रुपात प्रगट झाले*.

*अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* 🚩🙏

12/11/2025

एक वेळ शंभर दुश्मन परवडतील पण मनात कपट ठेवून वरवर आपलेपणा दाखवणारा जवळचा गद्दार नको..!!

06/10/2025

Let the world laugh
The world will see
When I come back

Some ropes aren’t just ropes—they’re lifelines.This picture hit me hard.One person’s need for control can feel like “jus...
28/09/2025

Some ropes aren’t just ropes—they’re lifelines.
This picture hit me hard.

One person’s need for control can feel like “just cutting a rope,” but that rope might be holding an entire family together.

Address

Belgaum

Telephone

+918618993767

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Food For Needy, Help For Needy, Education For Needy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share