Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड

  • Home
  • India
  • Beed
  • Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड

Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड youtube channel :-

Instagram:-
zilla_parishad_beed

​बीड जिल्ह्याचा ग्रामीण विकास व लोककल्याणकारी योजनांचे अधिकृत व्यासपीठ. जि.प.च्या विविध विभागांची माहिती, बातम्या व महत्त्वाच्या घोषणा एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा.

18/05/2026

"देवळा येथील प्रगतिशील शेतकरी श्री. रवींद्र देवरवाडे यांचा मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग!"

18/05/2026

'एल निनो'चे संकट आणि खरीप हंगामाचे नियोजन! 🌾🌦️
बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, चालू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 'एल निनो' (El Niño) चा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसा खंड पडणे किंवा मान्सून लांबणीवर जाणे असे बदल पाहायला मिळतात.

​⚠️ 'एल निनो'मुळे शेतीवर होणारे परिणाम!!
​🌧️ पावसाचा लहरीपणा
​🌡️ तापमानात वाढ.
​📉 उत्पादनात घट.

​🌱 पिकांची निवड (Crop Selection):
1. कमी कालावधीचे सोयाबीन
2. तृणधान्य व कडधान्ये
3. आंतरपीक पद्धत.

​📞 अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या गावातील 'कृषी सहाय्यक' किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
​ #खरीपहंगाम२०२६ #पिकनियोजन #लहरीहवामान #बीडकृषीविभाग

18/05/2026

🧪 शेतीचा पाया, मातीची तपासणी! यंदाच्या हंगामापूर्वी 'माती परीक्षण' नक्की करा! 🌾
जिल्हा परिषद बीडच्या कृषी विभागातर्फे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, यंदाच्या खरीप हंगामापूर्वी आपल्या शेताचे माती परीक्षण आवर्जून करून घ्या.

मातीचा नमुना कसा घ्यावा? (सोपी पद्धत):
​१. जागा निवड: शेतातील प्रातिनिधिक ५ ते ६ जागा निवडा. (झाडाखालील, विहिरीजवळील किंवा खत टाकलेली जागा टाळा).
२. 'V' आकाराचा खड्डा: निवडलेल्या जागेवरील कचरा साफ करून तिथे कुदळीने किंवा खुरप्याने १५ ते २० सेमी (अर्धा फूट) खोलीचा 'V' (व्ही) आकाराचा खड्डा करा.
३. नमुना गोळा करणे: त्या खड्ड्याच्या एका बाजूची वरपासून खालपर्यंतची २ सेमी जाडीची मातीची चकती (थर) खरवडून काढा.
४. माती एकत्र करणे: गोळा केलेली सर्व जागांची माती एका स्वच्छ प्लास्टिकच्या घमेल्यात एकत्र करा.
५. अर्धा किलो माती: एकत्र केलेली माती गोल पसरवून त्याचे चार भाग करा. आमनेसामनेचे दोन भाग काढून टाका आणि उरलेले दोन भाग एकत्र करा. अर्धा किलो माती उरेपर्यंत ही प्रक्रिया करा.
६. माहितीचे लेबल: ही माती स्वच्छ कापडी पिशवीत भरून त्यावर आपले नाव, गट नंबर, मोबाईल नंबर आणि पुढील पिकाचे नाव टाकून जवळच्या शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवा.
​💡 माती परीक्षणाचे मुख्य फायदे:

​💰 पैशांची बचत.
​🌱 जमिनीचे आरोग्य.
​🌾 पिकांची जोमदार वाढ.
​🧪 अन्नद्रव्यांची कमतरता स्पष्ट होते.

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा.
​ #मातीपरीक्षण #समृद्धशेतकरी #बीडजिल्हा #खरीपहंगाम२०२६

18/05/2026

🚜 बीबीएफ (BBF) तंत्रज्ञान: सोयाबीन लागवडीची आधुनिक आणि फायदेशीर पद्धत! 🚜
​बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, बदलत्या हवामानात सोयाबीनचे बंपर उत्पादन घ्यायचे आहे? मग यंदा पारंपरिक पद्धत सोडा आणि बीबीएम (Broad Bed Furrow - रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञानाचा अवलंब करा!
काय आहे बीबीएम (BBF) तंत्रज्ञान?
​या पद्धतीमध्ये ट्रॅक्टरचलित बीबीएम यंत्राच्या साहाय्याने ४ ते ५ फूट रुंदीचे गादीवाफे (Beds) तयार केले जातात आणि दोन्ही बाजूंना सर्या (Furrows) पाडल्या जातात. या गादीवाफ्यांवर सोयाबीनची पेरणी केली जाते.
​💧 पाण्याचा योग्य निचरा.
​🌱 दुष्काळावर मात.
​🌾 पिकाची जोमदार वाढ.
​🚜 आंतरमशागत सोपी.
​💰 उत्पादन खर्च कमी, नफा जास्त.

​🚜 चला, यंदाच्या खरीप हंगामात आधुनिकतेची कास धरूया... सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊया!

अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
​ #कृषीविभाग #बीडशेतकरी #आधुनिकशेती #खरीपहंगाम२०२६

बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सध्या जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा...
09/05/2026

बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सध्या जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितीन रहमान साहेब यांनी पाटोदा तालुक्यातील बाधित गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जनगणना मोहिमेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहमान यांचा सक्रिय सहभाग! 📝✅
09/05/2026

जनगणना मोहिमेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहमान यांचा सक्रिय सहभाग! 📝✅

मा. श्री. जितिन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी पाटोदा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन प...
08/05/2026

मा. श्री. जितिन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी पाटोदा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

🚰 ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारण साठी टँकर प्रस्तावित आहेत, त्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांची माहिती घेतली.

💧 तसेच जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत पाटोदा तालुक्या अंतर्गत विविध गावांना भेटी देऊन तेथील पाणीपुरवठा स्त्रोतांची सखोल पाहणी करण्यात आली. कामांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता व वितरण व्यवस्थेची तपासणी करण्यात आली.

📌 यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जल जीवन मिशनची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या.यावेळी कार्यकारी अभियंता श्री बिडकर साहेब,
भूवैज्ञानिक श्री टर्फे साहेब व श्री कोरडे साहेब , कनिष्ठ अभियंता श्री शिंदे साहेब उपस्थित होते.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितीन रहमान यांचा स्वगणनेत सहभागजनगणना अंतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत बीड...
08/05/2026

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितीन रहमान यांचा स्वगणनेत सहभाग

जनगणना अंतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितीन रहमान यांनी स्वतः स्वगणना पूर्ण करून जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

यावेळी त्यांनी सर्व जि. प. अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनीही स्वगणना करून जनगणनेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

बीड जिल्हा जनगणना कार्यालयाच्या वतीने राज्य समन्वयक अनुज गोठी तसेच जिल्हा समन्वयक आशिष शिंदे यांनी स्वगणनेची संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली.

📢 “प्रत्येक नागरिकाचा सहभाग — अचूक जनगणनेचा आधार”


​ #नागरिक_कर्तव्य

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! आता जनावरांच्या उपचारासाठी डॉक्टर येणार थेट तुमच्या बांधावर! 🐄🏥​बीड जिल्ह्यातील पशुपालकांसा...
08/05/2026

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! आता जनावरांच्या उपचारासाठी डॉक्टर येणार थेट तुमच्या बांधावर! 🐄🏥
​बीड जिल्ह्यातील पशुपालकांसाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. आता तुमचे पशुधन आजारी असल्यास घाबरण्याचे कारण नाही, फक्त एक कॉल करा आणि घरबसल्या पशुवैद्यकीय सेवा मिळवा.
​📌 पोस्टचे ठळक मुद्दे:
​📞 टोल-फ्री हेल्पलाइन: १९६२ (1962) वर कॉल करा.
​🚑 मोबाईल व्हेटर्नरी क्लिनिक: बीड जिल्ह्यात ३ मोबाईल क्लिनिक (गेवराई, केज आणि वडवणी) कार्यरत.
​⏱️ वेळेची बचत: कॉल केल्यानंतर अवघ्या दीड तासात पथक तुमच्या दारी पोहोचणार.
​💉 मिळणाऱ्या सेवा: तातडीचे उपचार, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, लसीकरण आणि वंध्यत्व तपासणी.
​''गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने अनेक जनावरांचे प्राण वाचवणे आता ​ सहज शक्य होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक पशुपालकापर्यंत ही मदत पोहोचेल! 🙏
​ #बीड #पशुसंवर्धन #शेतकरी #१९६२हेल्पलाइन

03/05/2026

ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला 'डिजिटल' उभारी: 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचा दिमाखदार सोहळा संपन्न! 🚩

मुंबई: उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित 'महालक्ष्मी सरस' या भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात संपन्न झाले.
कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली. 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताच्या सुरांनी संपूर्ण वातावरणात एक चैतन्यमय ऊर्जा निर्माण झाली.
यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे, राज्यमंत्री ना. श्री. योगेश कदम, मुंबईचे पालकमंत्री ना. श्री. मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

निपुण महाराष्ट्र अभियानात जिल्ह्याचा गौरव! 🏆​निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आपल्या जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळा 'स...
01/05/2026

निपुण महाराष्ट्र अभियानात जिल्ह्याचा गौरव! 🏆
​निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आपल्या जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळा 'सुपर निपुण' ठरल्या आहेत, त्यांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या मा. ना.श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या शुभहस्ते या शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
​या गौरवशाली प्रसंगी
मा. ​श्री. विवेक जॉन्सन (जिल्हाधिकारी- बीड), मा. ​श्री. जितीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड), मा.​श्री. मयुरेश मोरे (शिक्षणाधिकारी, प्राथमिक), ​श्री. राहुल चाटे (समन्वयक) हे उपस्थित होते.
​गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. सर्व सन्मानित शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

Address

Beed
Beed
432211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share