07/09/2026
बार्शी येथे ‘किडनी हेल्थ’ विषयावर डॉक्टर्स मीट कार्यक्रमाचे आयोजन
हिमालया वेलनेस कंपनीतर्फे बार्शी येथे “Supporting Renal Wellness – A Comprehensive Approach for Kidney Health” या विषयावर विशेष Doctors Meet Program आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता हॉटेल रामकृष्णा, बार्शी येथे करण्यात आले. किडनीचे आरोग्य, मूत्रपिंडाच्या कार्याचे संरक्षण आणि सर्वसमावेशक आरोग्यदृष्टीकोन याबाबत डॉक्टरांमध्ये शास्त्रीय चर्चा व ज्ञानाची देवाणघेवाण हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमात Dr. Pradeep U. Jadhav, MD (Ayu), PhD, Consultant Ayurvedic Physician, Shri Vishwabhairav Ayurved Chikitsalaya & Panchakarma Centre, Barshi यांनी वक्ते (Speaker) म्हणून मार्गदर्शन केले. तर Dr. Mohammed Usman Munshi, Manager – Scientific Services, Himalaya Wellness Company यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Moderator) केले.
किडनीच्या आरोग्याचे महत्त्व, मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक जीवनशैली, प्रतिबंधात्मक उपाय तसेच आयुर्वेद आणि आधुनिक आरोग्यदृष्टीकोनातून रेनल वेलनेसकडे पाहण्याच्या विविध पैलूंवर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी Mr. Ejaz Shaikh – Pharma Sales Officer, Mr. Abeed Kumthe – Medical Representative आणि Mr. Manoj Shinde – Regional Manager, Zandra Division, Solapur, Himalaya Wellness Company यांनी सहकार्य केले.
या Doctors Meet मुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना किडनी आरोग्याविषयी नवीन माहिती, अनुभवांची देवाणघेवाण आणि रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी समन्वयात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली.