MHADA

MHADA Maharashtra Housing and Area Development Authority offering affordable houses under various scheme
(2)

कुशल प्रशासक, वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!----------------------------...
31/05/2026

कुशल प्रशासक, वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
-------------------------------------------------------------------------------------------------
Humble tributes on the birth anniversary of Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar a visionary administrator, a courageous queen, and an embodiment of noble leadership. Her legacy of good governance, social welfare, and public service continues to inspire generations.

30/05/2026

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्या घराची चावी स्वीकारताना सौ. स्मिता संदीप ठाकूर यांनी व्यक्त केलेला आनंद हा प्रत्येक कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.

अशा अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे.

29/05/2026

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नव्या घराची चावी हातात घेताना श्री. मयुरेश कारंडे यांनी व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक मुंबईकराच्या स्वप्नाला स्पर्श करणाऱ्या आहेत.

पिढ्यानपिढ्या चाळ संस्कृतीत वाढलेल्या कुटुंबांना आता अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार घरांचा नवा आधार मिळत आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा, संघर्ष आणि आशा आता वास्तवात उतरत असून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या GPR 2.0 उपक्रमांतर्गत म्हाडाकडून डिजिटल प्रशासनाला नवी गती देत नागरिकांच्या सोयीसाठी ‘CFC @ Home’ आ...
28/05/2026

महाराष्ट्र शासनाच्या GPR 2.0 उपक्रमांतर्गत म्हाडाकडून डिजिटल प्रशासनाला नवी गती देत नागरिकांच्या सोयीसाठी ‘CFC @ Home’ आणि ‘Visitor Management System’ या दोन अत्याधुनिक डिजिटल सुविधांचे लोकार्पण!

‘CFC @ Home’ सुविधेमुळे नागरिकांना विविध अर्ज, तक्रारी, कागदपत्रे आणि शुल्क भरणा यासह अनेक सेवा आता घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. तसेच ‘Visitor Management System’ मुळे अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट, मंजुरी प्रक्रिया आणि भेट व्यवस्थापन अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याच्या दिशेने म्हाडाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

आजची योग्य निवड… उद्याचं उज्ज्वल भविष्य!म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक!गृहस्वप्...
28/05/2026

आजची योग्य निवड… उद्याचं उज्ज्वल भविष्य!

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक!

गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करा.

सर्वांना ईद-उल-अजहा निमित्त हार्दिक शुभेच्छा!---------------------------------------------------------------------EID-AL...
28/05/2026

सर्वांना ईद-उल-अजहा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

---------------------------------------------------------------------
EID-AL-ADHA Mubarak to all!

आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि विश्वासार्ह बांधकामासह मुंबईत तुमच्या हक्काच्या घराची सुवर्णसंधी!म्हाडा मुंबई मंडळाच्या ...
27/05/2026

आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि विश्वासार्ह बांधकामासह मुंबईत तुमच्या हक्काच्या घराची सुवर्णसंधी!

म्हाडा मुंबई मंडळाच्या कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील सदनिकांच्या किंमतीत ७.५% कपात करण्यात आली असून प्रत्येक सदनिकेसोबत विनामूल्य पार्किंग सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

तुमच्या स्वप्नातील घर आता अधिक किफायतशीर दरात!
अर्ज करण्याची अंतिम मुदत : २८ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
आजच अर्ज करा http://housing.mhada.gov.in

आधुनिक सुविधांसह हक्काचे घर मिळवण्याची अंतिम संधी जवळ आली आहे!म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आता केवळ ...
27/05/2026

आधुनिक सुविधांसह हक्काचे घर मिळवण्याची अंतिम संधी जवळ आली आहे!

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आता केवळ २ दिवस बाकी!
आजच अर्ज करून तुमच्या स्वप्नातील घराकडे एक पाऊल पुढे टाका.
https://housing.mhada.gov.in

हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ!म्हाडा मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीसाठी अर्ज करण्याची अंतिम स...
26/05/2026

हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ!

म्हाडा मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी आता जवळ आली आहे.

फक्त ३ दिवस शिल्लक!

गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करा.

25/05/2026

“वर्षानुवर्षे पाहिलेलं हक्काच्या घराचं स्वप्न अखेर झालं साकार!”

वरळी बीडीडी चाळीत बालपण घालवलेल्या सरिता मिश्रा यांनी अनेक वर्षे छोट्या जागेत कुटुंबासोबत आयुष्य जगले. अखेर म्हाडाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि नव्या आशांसह नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे.

Address

Grihanirman Bhavan Kalanagar, Bandra East

400051

Alerts

Be the first to know and let us send you an email when MHADA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MHADA:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share