10/09/2026
आबा - अण्णा- राळेगण - वाघोळा- ग्रामविकासाचा एक जुना ऋणानुबंध!
काल मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा साहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
अण्णांना भेटताना मन पुन्हा अनेक वर्षे मागे गेले.
कै. शेषराव पाटील गायकवाड (आबा) यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आमचे वाघोळा गाव आदर्श गाव म्हणून उभे राहत होते, त्यावेळी आदरणीय अण्णा हजारे यांनी वाघोळा येथे आबांच्या ग्रामविकासाच्या कामाचा आणि गावाच्या वाटचालीचा गौरव केला होता.
एका बाजूला राळेगणसिद्धीचे अण्णा आणि दुसऱ्या बाजूला वाघोळ्याचे आबा
गाव बदलायचे असेल तर गावकऱ्यांना सोबत घेऊन, श्रमदानातून आणि लोकसहभागातून विकास उभा करायचा, हीच त्या काळातील दोन्ही पिढ्यांची विचारधारा होती.
आज त्या पहिल्या पिढीच्या ग्रामविकासाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.
आबांनी सुरू केलेला ग्रामविकासाचा प्रवास थांबलेला नाही, तो आजही अखंडित सुरू आहे.
गाव, ग्रामसभा, पाणी, शिक्षण, रोजगार आणि लोकसहभाग या विषयांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही आमच्या परीने काम करत आहोत.
अण्णांना भेटल्यानंतर एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली, गाव बदलण्यासाठी पदाची गरज नसते, इच्छाशक्ती आणि लोकांचा सहभाग लागतो.
आबांच्या आठवणी आणि अण्णांचे आशीर्वाद हीच आमची मोठी ताकद आहे.
आदरणीय अण्णा हजारे लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!