06/09/2026
📍 श्री. चंद्रकौशल्य तडस सभागृह, देवळी
📌 रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६
भारतीय जनता पार्टी, वर्धा जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज देवळी येथे उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीस मा. ना. डॉ. पंकजजी भोयर राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा,श्री. संजयजी गाते भाजपा जिल्हाध्यक्ष, वर्धा, श्री. संजयजी भेंडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, श्री. रामदासजी तडस भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार, श्री. दिनेशजी सूर्यवंशी भाजपा विदर्भ विभाग संयोजक,श्री. सुमितजी वानखेडे आमदार, आर्वी विधानसभा, श्री. राजेश बकाने-आमदार देवळी-पुलगाव विधानसभा,श्री. सुरेशजी वाघमारे माजी खासदार, श्री. सुनीलजी गफाट ,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष,श्री. कमलाकरजी निंभोरकर, भाजपा जिल्हा महामंत्री,श्री. अशोकजी कलोडे भाजपा जिल्हा महामंत्री,श्री. श्रीधरजी देशमुख भाजपा मुख्यालय प्रभारी, सौ. वैशालीताई येरावार भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, श्री. अतुलजी तराळे भाजपा जिल्हा संयोजक यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, नगरपरिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय व एकजूट वाढविणे आणि जनसेवेच्या माध्यमातून विकासाची गती अधिक वेगवान करणे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भाजपा कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद!
कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून संघटन अधिक मजबूत करत जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
एकजूट कार्यकर्त्यांची…
मजबूत संघटनेची…
आणि विकासाच्या नव्या पर्वाची! 🚩
#देवळीपुलगावविधानसभा #जिल्हा_कार्यकारिणी #भाजपा #संघटन_मजबूत_संकल्प_विकासाचा #विकास #जनसेवा #राष्ट्रसेवा #भाजपाकार्यकर्ता