Nagpur Citizens Forum

Nagpur Citizens Forum Unite, Uplift, Empower

01/03/2026

वाढती वाहतूक समस्या, अतिक्रमण झालेल्या गणेशपेठ बस स्थानक मधील परिस्थिती मांडताना फोरम चे सदस्य.

01/03/2026

👉 सिविक सेन्स (नागरी जाणीव) म्हणजे फक्त नियम नाही, तर कर्तव्य आहेत.

👉 बदल सरकारकडून नाही, आपल्यापासून सुरू होतो.
चला, आजपासून एक संकल्प करूया –

मी बदलणार… आणि माझं शहर घडवणार.. 💪


आज Nagpur Citizens Forum च्या सर्व सदस्यांनी एकत्र येत गणेशपेठ बसस्टँड परिसरातील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले....
01/03/2026

आज Nagpur Citizens Forum च्या सर्व सदस्यांनी एकत्र येत गणेशपेठ बसस्टँड परिसरातील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

गणेशपेठ बसस्टँड परिसरात वाढलेले अतिक्रमण, सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या मधोमध सुरू असलेल्या विभागकाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाने कामादरम्यान ठेवलेले प्लास्टिकचे ड्रम्स मागील तीन महिन्यांपासून त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून आहेत. हे ड्रम्स अनियोजित पद्धतीने ठेवले असल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.

याशिवाय, नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता पार करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “नो पार्किंग”चे फलक असतानाही ऑटो व रिक्षाचालकांची अनधिकृत पार्किंग सुरूच आहे. फुटपाथ पूर्णपणे अतिक्रमित झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही.

या सर्व समस्यांकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना कराव्यात, ड्रम्स हटवावेत, अतिक्रमण दूर करावे, पादचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागपूर सिटीझन फोरमच्या वतीने करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, हीच अपेक्षा.

Nagpur Municipal Corporation
Nagpur Police Commissionerate

23/02/2026

प्रजापती नगर रेल्वे अंडरब्रिजची दुरवस्था गंभीर; नागरिकांचा संताप आणि प्रतिक्रिया

22/02/2026

प्रजापती नगर रेल्वे अंडरब्रिजची दुरवस्था गंभीर; नागरिकांचा संताप, नागपूर सिटीझन्स फोरमचा इशारा

प्रजापती नगर येथील रेल्वे अंडरब्रिज (RUB) परिसरात साचलेले पाणी, अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर Nagpur Citizens Forum च्या वतीने आज नागरिकांसमवेत स्थळ पाहणी करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

प्रजापती नगर रेल्वे अंडरब्रिजची दुरवस्था गंभीर; नागरिकांचा संताप, नागपूर सिटीझन्स फोरमचा इशाराप्रजापती नगर येथील रेल्वे ...
22/02/2026

प्रजापती नगर रेल्वे अंडरब्रिजची दुरवस्था गंभीर; नागरिकांचा संताप, नागपूर सिटीझन्स फोरमचा इशारा

प्रजापती नगर येथील रेल्वे अंडरब्रिज (RUB) परिसरात साचलेले पाणी, अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर Nagpur Citizens Forum च्या वतीने आज नागरिकांसमवेत स्थळ पाहणी करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
अपघातांची मालिका; जीव मुठीत धरून प्रवास.

अंडरब्रिजच्या भिंतींमधून सातत्याने होणारी पाण्याची गळती आणि रस्त्यावर साचलेला चिखल यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणात घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक राजू मणियार यांनी सांगितले की, “दररोज साचलेल्या पाण्याचा आणि घाणीचा सामना करावा लागतो. नुकताच माझ्या सुनेचा येथे अपघात झाला.”

एचबी टाऊन परिसरातील रहिवासी संजय खेतान यांनी माहिती दिली की, या ठिकाणी दररोज सुमारे १० ते १२ लहान-मोठे अपघात घडत आहेत. विशेषतः मेट्रोच्या पिलरमुळे तयार झालेला ‘ब्लाइंड स्पॉट’ हा अपघातांना कारणीभूत ठरत असून वाहनचालकांसाठी तो धोकादायक ठरतो आहे.

ईश्वर बनसोड यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले.

तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेध
फोरमच्या सदस्यांनी पाहणीत नमूद केले की, मेट्रो पिलरच्या रचनेमुळे समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी, हा ‘ब्लाइंड स्पॉट’ संभाव्य अपघातांचे केंद्र बनला आहे. तसेच, अंडरब्रिजच्या भिंतींमधून पाइपद्वारे सतत रस्त्यावर येणारे पाणी रस्ता निसरडा करत असून सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

फोरमची ठोस मागणी
नागपूर सिटीझन्स फोरमने संबंधित विभागाकडे तात्काळ गळती दुरुस्ती, ब्लाइंड स्पॉट दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना, तसेच परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याची मागणी केली आहे. समस्येचे त्वरित निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा फोरमने दिला आहे.

या उपक्रमात फोरमचे अमोल अगस्ती, चेतन रामटेके, प्रशिक कोटांगळे, रजत पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

झाडांनाही वेदना होतात...झाड खिळे मुक्त अभियान...विसरलात तर नाही ना नागपूरकर
21/02/2026

झाडांनाही वेदना होतात...

झाड खिळे मुक्त अभियान...विसरलात तर नाही ना नागपूरकर

🚦 सुधरा रे नागपूरकर 🚯एक जनजागृती उपक्रम, Nagpur Citizens Forum कडूनआपलं शहर सुंदर आहे… पण आपण ते सुंदर ठेवतोय का? 🤔👉 रस्...
20/02/2026

🚦 सुधरा रे नागपूरकर 🚯

एक जनजागृती उपक्रम, Nagpur Citizens Forum कडून
आपलं शहर सुंदर आहे… पण आपण ते सुंदर ठेवतोय का? 🤔

👉 रस्त्यावर कचरा टाकतो
👉 सिग्नल तोडतो
👉 नो-पार्किंग मध्ये गाडी लावतो
👉 सार्वजनिक ठिकाणी घाण करतो

आणि मग म्हणतो — “नागपूर शहराचं काय झालं?”
शहर बदलायचं असेल तर सगळ्यात आधी आपण बदलायला हवं..

✅ कचरा कचरापेटीतच टाका
✅ ट्रॅफिक नियम पाळा
✅ ओला-सुका कचरा वेगळा करा
✅ सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवा
✅ हॉर्नचा अनावश्यक वापर टाळा

नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखा.
Civic Sense ही फक्त शब्द नाहीत, ती सवय आहे..

चला, आपण सगळे मिळून ठरवूया —
“माझं शहर, माझी जबाबदारी”

18/02/2026
स्मार्ट सिटीच्या अंतिम टप्प्यातून नागपूर बाहेर..Loksatta
09/02/2026

स्मार्ट सिटीच्या अंतिम टप्प्यातून नागपूर बाहेर..

Loksatta

08/02/2026

नागरी जाणीव म्हणजे..

❌ फक्त पोस्ट टाकणे नाही
❌ फक्त तक्रार करणे नाही

✅ कचरा योग्य ठिकाणी टाकणे
✅ वाहतुकीचे नियम पाळणे
✅ रस्त्यावर, फूटपाथवर, सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखणे
✅ “हे आपलं शहर आहे” ही भावना मनात ठेवणे

🏙️ शहर प्रशासनाने शहर चालवायचं,
पण शहर सुधारायचं काम नागरिकांचं आहे!

रस्ता आपला आहे,
फूटपाथ आपला आहे,
शहर आपलं आहे,
मग जबाबदारीही आपलीच आहे.
आज नाही तर कधी?
आपण नाही तर कोण?

👉 चला, आजपासून नागरी जाणीव अंगीकारूया
👉 स्वच्छ, शिस्तबद्ध आणि सुरक्षित नागपूर घडवूया

Nagpur Citizens Forum
#नागरी_जाणीव

#जबाबदार_नागरिक
#माझं_शहर_माझी_जबाबदारी

Nagpur Municipal Corporation Nagpur Police Commissionerate

Address

Nagpur Road
Area

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur Citizens Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category