KaSaMaDe

KaSaMaDe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KaSaMaDe, Landmark & historical place, Kalwan,Satana,Malegaon,Deola, .

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिकच्या अध्यक्ष पदी मा.श्री. केदा(नाना)आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नानाश्र...
24/12/2017

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिकच्या अध्यक्ष पदी मा.श्री. केदा(नाना)आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नानाश्री मनपूर्वक अभिनंदन

महाराष्ट्र राज्यात जलयुक्त मध्ये *चांदवड तालुक्याचा तिसरा नंबर* आला.यासाठी तालुक्याचे कर्तव्य दक्ष *आमदार डॉ राहुलदादा आ...
16/04/2017

महाराष्ट्र राज्यात जलयुक्त मध्ये *चांदवड तालुक्याचा तिसरा नंबर* आला.
यासाठी तालुक्याचे कर्तव्य दक्ष *आमदार डॉ राहुलदादा आहेर
तसेच जलयुक्तची कामे करणाऱ्या तालुक्यातील *सर्व अधिकारी वर्गाचे* व ज्या गावांमध्ये जलयुक्त ची कामे झाली तेथील *सर्व ग्रामस्थांचे* ही अभिनंदन व धन्यवाद.
💐💐💐💐💐💐

हा विजय तुमचा !विजय लोहणेर गटाच्या विकासाचा !!
23/02/2017

हा विजय तुमचा !
विजय लोहणेर गटाच्या विकासाचा !!

 #जि.प.समिती लोहोणेर गणातून निवड झाल्याबद्दल कल्पना आबासाहेब देशमूख यांचे विलास (नाना) निकम यांच्या तर्फे अभिनंदन!!!
23/02/2017

#जि.प.समिती लोहोणेर गणातून निवड झाल्याबद्दल कल्पना आबासाहेब देशमूख यांचे विलास (नाना) निकम यांच्या तर्फे अभिनंदन!!!

29/09/2016

काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष

29 September 2016

मुंबई : उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक्स अर्थात दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.



या कारवाईनंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मुंबईत भाजप कार्यालयासमोर फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.



भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजप नेत्यांनी फटाक्या वाजवून, भारतीय जवानांचं कौतुक केलं.



त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.



भारत हा कणखर देश आहे, इथे दहशतवादाला थारा नाही हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलंय. संपूर्ण देशाला भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींचा अभिमान आहे, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

व.सा.का.च्या विकासाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवूनच डॉ. डी. एस्. बाबांनी अखेरचा श्वास घेतला..क.स.मा.दे. परिसराचे भूषण असणाऱ्य...
19/01/2016

व.सा.का.च्या विकासाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवूनच डॉ. डी. एस्. बाबांनी अखेरचा श्वास घेतला..
क.स.मा.दे. परिसराचे भूषण असणाऱ्या बाबांना सलाम व भावपूर्ण श्रद्धांजली.. असा नेता पुन्हा होणे नाही.. 🙏💐

16/01/2016

वसंतराव दादा पाटिल सहकारी साखर कारखाण्याचा २९ वा गाळप हंगामाचा शुभारंभ दिनाक "१८ जानेवारी २०१६" (सोमवार) रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणविस साहेब यांच्या शुभहस्ते व मा.ना.चंद्रकांत (दादा) पाटिल सहकार मंत्री , मा.ना.गिरीष जी महाजन जलसंपदा मंत्री,मा.ना.दादाजी भूसे सहकार राज्यमंत्री आदिसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून सदर गळीत हंगामासाठी आपण उपस्थित रहावे..हि आग्रहाची विंनती.
आपला स्नेहांकित आ.डॉ.राहुल दौलतराव आहेर

17/12/2015

वासाकाची चिमणी पुन्हा सुरु होत असल्याने कर्मचारी,शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावर

वसाका कसमापट्याचा सामूहिक सहकारी समृद्धीचे एकमेव वैभव.कसमापट्याचा विकास मोजायचा झाला तर"वसाका'ला स्केलपट्टी लावावीच लागेल. कारण ही तसेच आहे. गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांच्या घरात लग्नात मोठा बॅंड वाजला.कचेरीवरच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये चहलपहल वाढली.धाब्याची जागा स्लॅबने घेतली.त्याला कुठेना कुठे"वसाका'च्या उसाच्या टिपऱ्यांचा संबंध आहेच. म्हणूनच गेल्या तिन वर्ष्यापासून बंद असलेल्या वसाका उद्या पुन्हा सुरु होत असल्याने परिसरातील शेतकरी व कर्मचार्यां सह सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात किंवा दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणारा 'वसाका' गेल्या तिन वर्ष्या पासुन बंद होता.गेल्या तिन वर्ष्यात पुलाखालून बरेच पाणी वाहिल्यानंतर आ डॉ राहुल आहेर व केदा आहेर या जोडगोळीच्या प्रयत्नांना यश येत उद्या कारखान्याच्या बॉयलरचे अग्नी प्रदीपन होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या "वसाकाची "चाके पुन्हा फिरणे हि आनंदाची बाब आहे.

वसाका कसमादेच्या विकासाचे केंद्रबिंदू आहे.त्यामुळे शेतकरी,कामगार,मजूर व वसाकावर अवलंबून असणाऱ्या अनेक व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आले होते.
वसाका कारखान्यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर अवकळा आली होती.कोट्यावधी रुपयांचे रुपयांचे कर्ज कारखान्यावर असताना कारखाना कसा सुरु होईल हाच प्रश्न प्रत्येकाला सतावत होता.प्रकृती साथ देत नसताना देखील माजी आरोग्यमंत्री डॉ डी एस आहेरांनी सुरुवाती पासूनच कारखाना सुरु होनेकामी विशेष प्रयत्न केले.डॉ राहुल आहेर आमदार झाल्यानंतर या प्रयत्नांना विशेष गती आली. नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राज्य सहकारी बँक यांच्यात समन्वय साधून आमदार डॉ राहुल आहेर यांनी सरकारला जबाबदारी घेण्यास राजी केले हे त्यांचे सर्वात मोठे यश आले आहे.
जिल्हा बँकेने कर्जपुरवठा केल्याने वासाकाची चिमणी पुन्हा सुरु होत असल्याने कारखान्याशी संबंधित सर्वच घटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार डॉ राहुल आहेर यांनी पुढाकार घेवून राज्य शासनाच्या आजारी कारखान्यांना मदत देण्याच्या धोरणाचा फायदा कारखान्याला मिळवून दिला व नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाचे हमीपत्र देवून वसाकाला अर्थसहाय्य उपलब्ध करून घेतले याकामी जिल्हा बँकेचे संचालक तथा जि.प. सभापती केदा आहेर यांनी जिल्हा बँकेत कारखान्याची भक्कम बाजू लावून धरीत अर्थसहाय्य प्राप्त करून घेतले त्यामुळेच कारखान्याची चाके पुन्हा सुरु होण्यास मदत झाली असून कारखान्याचे सर्व कामगार तसेच कारखान्याशी निगडीत असलेले ऊस वाहतूकदार ,ट्रक चालक -मालक ,ऊस तोडणी कामगार ,व्यापारी ,पुरवठाधारक व प्रामुख्याने कारखान्याचे सभासद ,ऊस उत्पादक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण असून गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता कारखाना कसा चालू होईल यासाठी वेळप्रसंगी पदरमोड करून अहॉरात्र परिश्रम घेणारे सर्व कामगार ,कार्यकारी संचालक ,अधिकारी वर्ग,कामगार प्रतिनिधी व प्रकृती ठीक नसतानाही कारखान्याच्या घडामोडीत भाग घेणाऱ्या डॉ . माजी आरोग्यमंत्री डॉ . डी . एस . आहेर,आमदार डॉ . राहुल आहेर ,जि.प. सभापती केदा आहेर यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले असून नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही अर्थसहाय्य मिळवून दिल्याने कारखान्याला पुन्हा सुगीचे दिवस येणार आहेत .
आता गरज आहे ती कसमादेतील सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वसाका सुरु होने कामी मतभेद विसरून पुढाकार घेतलेल्या आमदार डॉ राहुल आहेर व केदा आहेर यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची.

ऊस तोडणी हंगामात हमखास नजरेस पडतात त्यारस्त्याने जाणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाड्या. यंत्र युगातही बैलांचेमहत्व टिकून असल...
25/06/2015

ऊस तोडणी हंगामात हमखास नजरेस पडतात त्या
रस्त्याने जाणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाड्या. यंत्र युगातही बैलांचे
महत्व टिकून असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल. पण, उसाने
भरलेली गाडी ओढताना काय कष्ट पडतात, हे त्या मुक्या
प्राण्यालाच ठाऊक. डांबरी व सिमेंटच्या रस्त्यावरून गाडी ओढताना
तर फारच कसरत होते. कारण पाय घसरला तर....., आपण
कल्पनाच केलेली बरी! पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल चेक
पोस्टजवळ अशाच एका पाय घसरलेल्या बैलाची धडपड... त्याला
सावरणाऱ्या धन्याचे प्रयत्न अन् कासरे हातात घेतलेल्या
गाडीवानाच्या भूमिकेतील मालकीणीची घालमेल..

11/06/2015

राज्यातील पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या 36 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात नाशिकमध्ये 11 अधिकारी बदलून येणार आहेत.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आठ अधिकारी येणार आहेत. मालेगाव ग्रामीणला एक, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आणि महामार्ग वाहतूक शाखेत प्रत्येकी एक याप्रमाणे तीन अधिकारी येणार आहेत. नाशिकला विविध विभागांत बदलून येणारे अधिकारी असे ः फुलसिंग श्‍यामराव पवार (आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था), भीमराव नारायण कोरे (महामार्ग वाहतूक शाखा), तर मुंबईहून अरविंद नारायण वाढणकर (उपविभागीय अधिकारी, मालेगाव) बदलून येणार आहेत.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत येणारे अधिकारी (कंसात कोठून येणार) ः रमेश भगवंतराव तायवडे (नागपूर प्रशिक्षण केंद्र), साहेबराव धर्माजी जाधव (वर्धा), विठ्ठल रामचंद्र दामगुडे (मुंबई), रमेश विठ्ठल सोनुने (यवतमाळ), सूर्यकांत नथुराम कांबळे (पुणे शहर), महेश दत्तात्रय रायकर (राज्य गुप्तवार्ता, मुंबई), सूर्यभान महादू कदम (गुन्हे अन्वेषण, पुणे), रामेश्‍वर शिवनारायण सुपले (मुंबई शहर).

या बदल्यांत नाशिक शहर आयुक्तालयातून रामदास हिरालाल राठोड व अनिल नारायण सांडभोर (शहर) यांची बदली झाली आहे.

31/05/2015

KaSaMaDe CALIFORNIA of INDIA[नार-पार पाणी योजना कसमादे शेतकर्यांसाठी]
*KaSaMaDe [Rich in Fruits, Vegetables and Agril Production] can be CALIFORNIA of INDIA.
*More than 50 TMC Water Can be made avaible by DIVERTING in to GIRNA, the rivers Originates in NASIK district draining down towards the westwards into the ARABIAN SEA.
AND
*INTERLINKING OF Rivers…… GIRNA [गिरणा]…PUNAD [पुनद ]…ARAM [आरम ]… MOSAM.[ मोसम]
[email protected] TMC…..20Times of chankapur.
HARANBARI-..........50Times of haranbari.
*DIVERSION in to GIRNA ……………………..The Rivers [Originates in “PEITH”;”SURGANA”; and”DINDORI” Tahsil of NASIK district] draining down towards the westwards into the ARABIAN SEA…………………………Rivers to be Diverted in to GIRNA…NAR… PAR…CHONDI ..KAVERA...SASU..MAN… BARIK …DAMANGANGA.
*INTERLINKING OF Rivers…… ……. GIRNA…PUNAD…ARAM… MOSAM.
*NASIK district is drained by ‘2’ chief rivers, the GIRNA [KaSaMaDe], Godavari, and their tributaries.
Apart from these there are a number of Innumerable small Konkan rivers / streams [Originates in “PEITH” ; ”SURGANA” ; and ”DINDORI” Tahsil] draining down the western scarp of the Sahyadris towards
the westwards into the ARABIAN SEA.

Address

Kalwan,Satana,Malegaon,Deola

423301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KaSaMaDe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share